आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:कलश देत चला जाणूया नदीला उपक्रम सुरू

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गाेदावरी नदी अविरल, स्वच्छ, सुंदर व बारमाही वाहण्यासाठी शासन व नागरिक एकत्र आले आहेत. त्र्यंबकेश्वर येथील गंगाद्वार येथून “चला जाणूया नदीला’ या उपक्रमांतर्गत अमृत महोत्सव नदी यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे. गोदावरीच्या उपनद्या असलेल्या नंदिनी, वालदेवी, कपिला, वरुणा, मोती, अगस्ती व माळुंगी या नद्यांवर काम करणाऱ्या गोदासेवकांच्या हाती कलश सुपूर्द करून या उपक्रमास रविवारपासून (दि. ६) प्रारंभ करण्यात आला.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून गोव्याचे लोकायुक्त व माजी न्यायमूर्ती अंबादास जोशी, या उपक्रमाचे ब्रँड अॅम्बेसेडर अभिनेते चिन्मय उदगीरकर, नदीला जाणूया उपक्रमाच्या राज्य समितीचे अशासकीय सदस्य राजेश पंडित, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, जलबिरादरीचे विनोद बोधनकर, नरेंद्र चुग, स्मार्ट सिटीचे पी. बर्डे, गणेश भोळे, सरपंच जगन झोले, वन अधिकारी गणेश झोले, सत्संग फाउंडेशनच्या एम. वसुकी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते किरण भालेराव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी धीरज बच्छाव, राहुल रायकर, सुनील मेंढेकर, मनोज साठे, नितीन हिंगमिरे, उदय थोरात यांनी परिश्रम घेतले.

प्रत्यक्ष बंधारा बांधून सुरुवात : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सुपलीची मेट या गावच्या गावकऱ्यांनी व ब्लॉगर्स ग्रुपच्या सदस्यांनी व ग्रुप सत्संग फाउंडेशनच्या वतीने दगड व माती गोळा करीत येथे बंधारा बांधण्याच्या कामाची प्रत्यक्ष सुरुवात केली.

हे आहे “चला नदीला जाणूया’ उपक्रमाचे उद्दीष्ट
‘चला नदीला जाणूया’ या उपक्रमांतर्गत ९० नद्या प्रवाहित करण्यात येणार आहे. तसेच एक़ लाख स्वदेशी वृक्ष लागवड, जनजागृती, बंधारे बांधणे, भूजल पातळी वाढविणे, वनसंरक्षण करणे आणि नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...