आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Let's Know Rivera Mahaetsava For River Conservation; Starting From Gandhi Jayanti To Make Amrit Vahini In 75 Rivers Of The State| Marathi News

दिव्य मराठी विशेष:नदी संवर्धनासाठी चला जाणूया नदीला महाेत्सव; राज्यातील 75 नद्या अमृतवाहिनी करण्यासाठी गांधी जयंतीपासून प्रारंभ

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रामध्ये गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा तसेच पश्चिम वाहिन्यांच्या खोऱ्यातील ७५ नद्या अमृतवाहिनी करण्यासाठी गांधी जयंतीपासून (२ ऑक्टोबर) सुरवात होईल. वर्धा येथील सेवाग्राममध्ये आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डाॅ. राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत ‘चला जाणूया नदीला’ महोत्सवाची सुरुवात होणार आहे. या नद्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातील नंदिनी, कपिला, वरुणा, वालदेवी, अगस्ती व मोती या नद्यांचा समावेश आहे.

देशातील स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र जलबिरादरीचे अध्यक्ष नरेंद्र चुग यांनी सांगितले की, सिंहावलोकन केल्यावर प्रगती किती साधली आहे याची कल्पना येते. आरोग्य सदृढ राखण्यासाठी नदीचे आरोग्य ठीक करण्याचा संकल्प तरुणांसोबत महाराष्ट्रातील जनतेने केला आहे. राज्यातील ७५ नद्या अमृतवाहिनी करण्यासाठी जलबिरादरीतर्फे समाजाच्या सहभागातून ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. जलबिरादरीचे ब्रँड अॅम्बेसेडर अभिनेते चिन्मय उदगीरकर हे आहेत.

राज्याला पूर आणि दुष्काळमुक्त करण्यासाठी समाजाच्या सहभागाला पाठबळ देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सहकार्य करत आहेत. राज्यातील विविध नद्यांसाठी कार्यरत असलेले ११० जलनायक सहभागी होणार आहेत. १५ ऑक्टोबरला भारतरत्न डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी राज्यातील ७५ नद्यांवर एकाच दिवशी नदी यात्रेला सुरुवात होईल. नदी अभ्यासक, नदीप्रेमी, शेतकरी, विद्यार्थी, नदीचे स्टेक होल्डर, सरकारी यंत्रणांमधील अधिकारी यांचा सहभाग राहील. प्रत्येक नदीच्या यात्रेवेळी किमान १०० जणांचा सहभाग असावा, असा प्रयत्न राहील.

नदीच्या सद्यस्थितीची माहिती संकलित करणार
नदी यात्रेवेळी सरकारी यंत्रणेचे अधिकारी आणि नदीशी निगडित समाजाच्या सहभागातून सद्यस्थितीची माहिती संकलित केली जाईल. आधुनिक विज्ञानाची जोड देत आराखडा तयार केला जाईल. या आराखड्याची महाराष्ट्र सरकारचे सहकार्य आणि समाजाच्या सहभागातून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाईल.

नदी महोत्सवासाठी मुंबईचे किशोर धारिया, प्रा. स्नेहल दोंदे, नाशिकचे राजेश पंडित, औरंगाबादचे रमाकांत कुलकर्णी, अनिकेत लोहिया, प्रमोद देशमुख, पुण्याचे विनोद बोधनकर, डाॅ. सुमंत पांडे, नागपूरचे प्रद्युम सहस्त्रभोजने, वर्ध्याचे माधव कोटस्थाने, सोलापूरचे डाॅ. श्रीनिवास वडकबाळकर प्रयत्नशील आहे.

बातम्या आणखी आहेत...