आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:लोकचळवळीत सहभागी होऊन नाशिकला व्यसनमुक्त करू

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

समाज व्यसनमुक्त करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सजग होण्याची गरज आहे. जे लोक अमली पदार्थ विक्री करतात, त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. कुराण व हदीसमधून आपल्याला याबाबत मार्गदर्शन मिळते. या लोकचळवळीत सहभागी होऊन नाशिकला व्यसनमुक्त करू या, अशी साद सुन्नी दावते इस्लामचे प्रमुख प्रवक्ते मौलाना सय्यद अमीनूल कादरी साहब यांनी घातली.

जुने नाशिक येथील चौकमडई येथे ‘ड्रग्ज फ्री नाशिक’ या माेहिमेंतर्गत सुन्नी दावते इस्लामी या संस्थेकडून आयोजित अमली पदार्थ विरोधी जनजागृती सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया सुन्नी जामियतुल उलमाचे अध्यक्ष ज्येेष्ठ धर्मगुरू हजरत सय्यद मोईन मिया, सय्यद आसिफुल जिलानी साहब, सय्यद अल्ताफ अली साहब, खतिब ए शहर हाफिज हिसामोद्दीन साहब खतिब, हाफिज समीर साहब उपस्थित होते.

सय्यद अमिन म्हणाले की, अमली पदार्थांचे व्यसन हे समाजासाठी विनाशकारी आहे. तरुणांबरोबरच शालेय विद्यार्थीही व्यसनाच्या आहारी जात आहेत. सध्याची चिंताजनक परिस्थिती लक्षात घेता अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात मोहीम राबवून लोकांमध्ये जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक परिचिताला व्यसनापासून परावृत्त करावे. जेणेकरून व्यक्ती, कुटुंब आणि समाजाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचविता येईल.राजकीय नेत्यांनीही आपली समाजाप्रतीची जबाबदारी निभवण्याची वेळ आली असल्याचे ही त्यांनी सागितले.

हजरत सय्यद मोईन मिया यांनी प्रशासनालाही उद्देशून सांगितले की, नशेखोरीमुळे शहरात गुन्हेगारी, अपघात आणि आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी अमली पदार्थांची आयात व विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. सभेला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. प्रार्थनेने सभेची सांगता झाली.

बातम्या आणखी आहेत...