आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय जीवन:कोठारी कॉलेजमध्ये ग्रंथालय सप्ताह

नाशिक7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाएसाेच्या एम. एस. कोठारी अकॅडमी आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये ग्रंथालय सप्ताह राबविण्यात येत आहे. त्याचे उद्घाटन लेखिका व कवयित्री तन्वी अमित यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता देशपांडे, पर्यवेक्षिका वैशाली आठल्ये आदी उपस्थित होते.

यावेळी तन्वी म्हणाल्या की, शालेय जीवनात पुस्तकांमुळे झालेले संस्कार कायम मार्गदर्शक ठरतात. म्हणून आत्तापासून सर्वप्रकारच्या पुस्तकांचे वाचन करा असे सांगून वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी अशा उपक्रमाची गरज त्यांनी व्यक्त केली. ग्रंथालय सप्ताहांत विद्यार्थ्यांसाठी गोष्टींच्या पुस्तकातील विविध पात्र बनून येणे, शब्दांवरून कविता तयार करणे, अभिवाचन करणे या स्पर्धा आणि सार्वजनिक वाचनालय आणि संग्रहालयाला विद्यार्थ्यांची भेट, पुस्तक प्रदर्शन हे उपक्रम घेतले जाणार आहेत. ग्रंथालय सप्ताहाचे औचित्य साधून यावेळी मान्यवरांचे हस्ते रीडर्स क्लबचेही उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका सरिता देशपांडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय धनश्री कुलकर्णी यांनी केला. सूत्रसंचालन ग्रंथपाल स्मिता साैंदाणकर केले. पर्यवेक्षिका वैशाली आठल्ये यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...