आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी विभागाचा दणका:नाशिक जिल्ह्यातील 30 कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित; खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कारवाई

नाशिक12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिल्हा कृषी विभागाने जिल्ह्यातील विविध सेवा केंद्रांना चांगलाच दणका दिला आहे. तपासणी करून त्रुटी आढळलेल्या 30 सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.

यांच्यावर कारवाई

17 खते विक्री केंद्र, 6 बियाणे विक्री केंद्र, 7 किटकनाशके या केंद्रावर कृषी विभागाने कारवाई केली. युरिया खत हे टाॅपच्या 20 खरेदीदारांना विक्री केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली.

खरीप हंगामात कोणत्याही शेतकऱ्यांची फसवणुक होवु नये, तसेच खतासाठी व बियाण्यासाठी त्यांची गैरसोय होवु नये यासाठी कृषीमंत्री दादा भुसे यांनी कडक कारवाई करण्याचे कृषी विभागाला आदेश दिले होते. त्यानुसार नाशिक जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाने कृषी अधिक्षक विवेक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपसंचालक कैलास शिरसाठ, गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक अभिजिच घुमरे यांनी जिल्ह्यातील विविध सेवा केंद्राची तपासणी केली.

तपासणीत हे आढळले

  • खते, बियाणे यांचा साठा व भावफलक लावला नाही.
  • ईपाँज मशिनवरील शिल्लक साठा आणि प्रत्यक्षात असलेला साठा यांचा ताळमेळ बसला नाही.
  • साठा रजिस्टर वेळोवेळी पुर्ण केले नाही.
  • शेतकऱ्यांना खते, बियाणे व औषधांचे पक्के बील दिले नाही.

तर कडक कारवाई

''शेतकऱ्यांची फसवणुक व गैरसोय होवु नये यासाठी जिल्हातील सर्व केंद्रांना मार्गदर्शन करण्यात आले असुन त्यांना कारवाईच्या सुचना देखील देण्यात आल्या आहे. मात्र ज्या कृषी सेवा केंद्रामध्ये अनागोंदी कारभार आढळुन येईल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे'' - विवेक सोनवणे, जिल्हा कृषी अधिक्षक

या कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबीत

ओम साई शेती उद्योग भंडार ओतुर कळवण, कल्पक कृषी ट्रेंडिंग देवरगाव चांदवड, किसान कृषी सेवा केंद्र कासारी नांदगाव, जणगणना स्वंयरोजगार सेवा सहकारी संस्था, जय मल्हार कृषी मंदिर डोंगरगाव, निफाड, दराडे कृषी विकास केंद्र अस्वली इगतपुरी, निलेश कृषी सेवा केंद्र दुमाला, पाटील अँग्रो टेटस बोरी नांदगाव, बंधुप्रेम कृषी सेवा केंद्र वडनेर भैरव, बालाजी कृषी सेवा केंद्र नांदगाव, महाराष्ट्र खत विक्रे केंद्र नाशिकरोड, यश अँग्रो एजन्सी लासलगाव, वाजे कृषी मार्ट टाकेद,राणा फर्टिलायझर लासलगाव, विशाल कृषी मंदिर कळवण, श्री स्वामी समर्थ एँग्रो सर्विसेस उमराळे दिंडोरी, सप्तश्रृंगी कृषी सेवा केंद्र पिंपळगाव डुकरा, सोनवणे कृषी उद्योग सायखेडा, स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र नांदुर नांदगाव, स्वामी समर्थ फर्टीलायझर दिंडोरी.

बातम्या आणखी आहेत...