आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:वडिलांसह आजोबांच्या खून खटल्यात भावांना जन्मठेप, नाशिक जिल्ह्यातील घटना, एक भाऊ निर्दोष मुक्त

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वडीलांचे अनैतिक संबध असल्याच्या कारणातून वडिलांचा आणि त्यांना साथ देत असल्याच्या संशयातून आजोबाचा खून करणाऱ्या दोघा सख्ख्या भावांना जन्मठेपची शिक्षा ठोठवण्यात आली. दुहेरी खुन खटल्याचा निकाल शुक्रवार (दि. ६) रोजी लागला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जगमलानी यांनी ही शिक्षा ठोठवली. राहुल ज्ञानेश्वर फोकणे (२५) आणि प्रमोद ज्ञानेश्वर फोकणे (२३) असे शिक्षा झालेल्या आरोपींचे नावे आहेत. नितीन फोकणे याची निर्दोष मुक्तता केली.

२९ नोव्हेंबर २०१९ रोजी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मौजी घोटी खुर्द येथे शेतात हा प्रकार घडला होता. मृत ज्ञानेश्वर काशिनाथ फोकणे (४८) आणि त्यांचे वडील काशिनाथ वामन फोकणे (६५) यांच्या मालकीचे शेती, घर आणि हाॅटेल आहे. वडील ज्ञानेश्वर फोकणे यांचे अनैतिक संबध असल्याने त्यांना मद्याचे व्यसन जडले होते. यामुळे ते कर्जबाजारी झाले होते. त्यामुळे ते संपत्ती विकायची असे सांगत. त्यामुळे मुलांनी वडिलांसह आजोबाचा खून केला.

बातम्या आणखी आहेत...