आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:जीवनगौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन; कोचिंग क्लासेस संघटनेचे शिक्षक पुरस्कार जाहीर

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना व सपकाळ नॉलेज हब यांच्या संयुक्त विद्यमाने १० वी, १२वी विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी, आदर्श शिक्षक व जिल्हास्तरीय जीवनगौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थित जुनच्या शेवटच्या आठवड्यात पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संघटनेच्या वतीने देण्यात येणारा शिक्षक जीवनगौरव पुरस्कार ३२ वर्ष अध्यापनाचे कार्य केलेले सुधीर गायधनी यांना जाहीर झाला आहे. तर आदर्श शिक्षक म्हणून सुषमा पराजंपे, विशाखा काबरा,अमीर शेख, कौस्तुभ पराजंपे, विनित पिंगळे, किरण खाडे, विद्या राकडे, जुगल जोशी, मायकेल फर्नाडिस, विष्णु चव्हाण, विक्रम बालाजीवाले, संदीप घायाळ, सागर परेवाल, मनिष शहा, आरती खाबिया, योगेश बाहेती, दीप देवरे, महेश थोरात यांना प्रदान करण्यात येणार आहे.

तनर युवार आदर्श शिक्षक पुरस्कार शंकर कुंभार्डे, दुर्गेश तिवारी यांना जाहीर झाले आहे. शिक्षकाचे अध्यापनातील कार्य तसेच सामाजिक योगदान या निकषाद्वारे पुरस्कार्थींची निवड केली आहे. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष अशोक देशपांडे, मुकुंद रनाळकर, खजिनदार अतुल आचलिया, सचिव लोकेश पारख, नीलेश दुसे, संजय अभंग, कल्पेश जेजुरकर, विलास निकुंभ,प्रमोद गुप्ता, किशोर सपकाळे, सचिन अपसूंदे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...