आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएचएएलला मिळालेल्या ८३ लाइट काॅम्बॅक्ट एअरक्राफ्टचे उत्पादन बंगळूरू येथे सुरू हाेते, आता त्याचपैकी काही विमाने नाशिकच्या एचएएलमध्ये उत्पादित केली जाणार असून या करता येथे तिसरी उत्पादन लाइन उभारण्यात आली आहे. तिचे उद्घाटन संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. विशेष म्हणजे, याच प्रकल्पात मेंटेनन्स व आेव्हरहाॅलींग केलेले १०० वे सुखोई-३० एमकेआय विमानाचे सिग्नल आऊट प्रमाणपत्र मिग काॅम्प्लेक्सचे सीइआे साकेत चतुर्वेदी यांनी एचएएलचे सीएमडी अनंतकृष्णन यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भारतीय वायुसेनेचे एअर व्हाइस मार्शल सरिन यांना सुपूर्द केले.
नवीन उत्पादन लाइन कंपनीला लाइट काॅम्बॅक्ट एअरक्राफ्ट-एम के १ ए ची उत्पादन क्षमता १६ ते २४ विमाने प्रतिवर्षी वाढवण्यास सक्षम करेल. एचएएलच्या नाशिक विभागाने दरवर्षी २० सुखाेई-३० विमानांची पीक ओव्हरहॉल क्षमता गाठली. एचएएलने आधीच बंगळुरूमध्ये २ सुविधा उभारल्या आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.