आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाेकादायक:कमोदनगरच्या अंडरपासमधील दिवे बंद; पादचारी असुरक्षित, पाेलिस गस्तची मागणी

इंदिरानगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदिरानगर येथील कमोदनगर ते सिडको येथील अंडरपासमधील दिवे बंद असल्याने पादचाऱ्यांना उड्डाणपुलावरून मार्गक्रमण करावे लागत आहे. कमोदनगर येथील अंडरपासमधील दिवे बंद असल्याने या अंडरपासमध्ये कायमस्वरूपी अंधाराचे साम्राज्य आहे. या अंडरपासमधून पायी जा-ये करणाऱ्यांना रात्रीच्या वेळेस असुरक्षित वाटत असल्याने पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून उड्डाणपुलावरून हा रस्ता ओलांडावा लागत आहे. याबाबत संबंधितांनी दखल घेऊन त्वरित अंडरपासमधील दिवे चालू करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

अंडरपासमध्ये कारवाई न झाल्यास आंदाेलन कमाेदनगर येथील अंडरपासमधील प्रेमीयुगुलांचा व मद्यपींचा बंदोबस्त झाला नाही तर आमच्या स्टाइलने करू.- ऐश्वर्या गायकवाड, कमोदनगर समाजसेविका

प्रेमीयुगुलांना आवर घाला कमाेदनगरातील अंडरपासमध्ये पोलिसांनी गस्त घालावी. प्रेमीयुगुलांचा बंदोबस्त करावा. अभिजित पळसकर, रहिवासी

रात्री मद्यपींचा अड्डा कमाेदनगर येथील अंडरपास हा रात्रीच्या वेळेस मद्यपींचा अड्डा झाला आहे. येथील दिवे त्वरित सुरू करावेत. - विजय कोठारी, व्यावसायिक

बातम्या आणखी आहेत...