आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:केबीएचच्या तीन शिक्षकांना लायन्स इंटरनॅशनलचा आदर्श पुरस्कार

नाशिक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूररोड येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालयाचे मुख्याध्यापक कुणाल गोराणकर तसेच संस्था तथा शिक्षक प्रतिनिधी सुजाता पवार-शिंदे यांना लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या वतीने आयोजित गुरु सन्मान सोहळ्यात प्राचार्य, डाॅ. व्ही. बी. गायकवाड यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

श्री कालिकादेवी मंदिर संस्थानच्या वतीने संस्था तथा शिक्षक प्रतिनिधी सुजाता पवार-शिंदे यांना सुरगाणा येथील संस्थानिक सोनालीराजे पवार यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रौढ मित्रमंडळ,डिसूझा काॅलनी नाशिक यांच्या वतीने विद्यालयाचे उपशिक्षक व प्रसिद्धी विभागप्रमुख गिरीश कोठावदे यांना प्रा.यशवंत पाटील यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शाळा विकास समितीच्या अध्यक्षा, योगिता हिरे, पर्यवेक्षक रमेश बागूल व कर्मचारी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...