आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:पंचवटीत मद्य जप्त

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे महात्मा गांधी जयंती सप्ताहांतर्गत अवैध मद्य निर्मिती आणि वाहतुकीविराेधात कारवाई करण्यात येत असून पंचवटीत एका सॅन्ट्राे कारमधून गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या कारचालकासह दाेघांना अटक करण्यात आली आहे.

वाघाडी पुलाजवळच वाहने तपासणी सुरू असताना एका सॅन्ट्राे कारचालकाला अडविले. त्याच्या डिक्कीतून ८०० लिटरचा गावठी मद्यसाठा आढळून आला. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारसह सुमारे दाेन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पंचवटी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...