आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबनावट मद्यासाठी लागणारे अतीशुद्ध मद्यार्का वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून 78 लाख 35 हजारांचे मद्यार्क स्पिरीट जप्त करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मुंबई आग्रा रोडवरील सांगवी ता. शिरपुर जिल्हा धुळे येथे ही कारवाई केली. हे मद्यार्क नाशिकसह धुळ्यात बनावट मद्य बनवण्यासाठी सप्लाय होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार,भरारी पथक नाशिक ते धुळे महामार्गावर गस्त करत असतांना नाशिकच्या पथकाला माहिती तिळाली. मुंबई आग्रारोडवर सांगवी ता.शिरपुर येथे मोकळ्या जागेत एका पेट्रोल पंपाच्या शेजारी संशयित ट्रक दिसून आला. याट्रक मधून काही लोक रबरी नळीच्या साह्याने प्लास्टिक ड्रममधून स्पिरीट काढत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पथकाने संशयितांना घेरले मात्र अंधाराचा फायदा घेत संशयित फरार झाले. पथकाने ट्रक चालक संशयित बालमखान निजामउद्दीन खान रा. जैसलमेर राज्यस्थान यास अटक केली. चौकशीत स्पिरीट घेणारा संशयित पप्पु कैलास गायकवाड रा. सांगवी शिरपुर याचे नाव निष्पन्न झाले. पथकाने ट्रक पीबी 03 बीएच 8337 आणि पिकअक एमएच 18 एए 3857 जप्त केली. ट्रक मधून 200 लिटर क्षमतेचे दोन प्लास्टिक ड्रम 35 लिटर क्षमतेचे 4 बॅरल असे 35 हजार लिटर स्पिरीट आणि दोन वाहने असा 78 लाख 35 हजारांचा साठा जप्त केला. उपविभागीय अधिकारी अर्जून ओहळ, पथकाचे ए.एस.चव्हाण, व्ही.एम.पाटील, ए.जी. सराफ, यांच्या पथकाने ही कारवाई केली.
केरळमध्ये होणार होता सप्लाय
संशयित ट्रक स्पिरीट घेऊन केरळ मध्ये जात असतांना धुळे, नाशिकमध्ये मद्य तस्करांना स्पिरीट विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. बनावट मद्य बनविण्यासाठी या स्पिरटचा वापर होते. यात पाणी मिक्स केल्यानंतर बनावट मद्य तयार केले जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.