आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Literacy Mission Of Ratory, Teach Five Sutras For Quality Education; Distribution Of E learning Kit To Students For Modern Education| Marathi News

दिव्य मराठी विशेष:राेटरीचे लिटरसी मिशन, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची टीच पंचसूत्री ; विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासाठी ई़-लर्निग किटचे वाटप

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी रोटरी क्लब आॅफ नाशिकच्या माध्यमातून मिशन लिटरसी हा उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत टीच (TEACH) या पंचसूत्रीवर आधारित विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवत विविध उपक्रम राबविल्या जात आहे.

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी चांगले वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला जात आहे. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांसाठी प्रशिक्षण उपक्रम राबविले जात आहे. निरक्षर पालकांसाठीही साक्षरता उपक्रम राबविण्यात आला आहे.

टी (T)- महापालिका शाळा तसेच ग्रामीण भागातील शाळांतील शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील तज्ञांकडून ट्रेनिंग दिले जाते. तसेच सेमिनारचे आयोजन करून अध्ययन व अध्यापन दर्जा सुधारण्यासाठी मदत केली जाते. आदर्श शिक्षकांना पुरस्कार देऊन प्रोत्साहन दिले जाते.

ई (E)- विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण घेता यावे यासाठी ई लर्निंगचे किट वाटप करण्यात आले आहे. विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून ई लर्निंगचे किट खरेदी करून ते गरीब व गरजू विद्यार्थ्यांना राेटरीतर्फे वाटप केले जात आहे.

ए (A)- अडल्ट लिटरसी प्रोग्राम अर्थात प्राैढ साक्षरता उपक्रमांतर्गत इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांकडे पालकांच्या शिक्षणासाठी किट वाटप करण्यात आले. राेटरीतर्फे लिटरसी मिशन अंतर्गत आतापर्यंत ४५० पालकांना लिटरसी किट देण्यात आले.

सी (C)- शालेय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच त्यांना चागंल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी या चाइल्ड डेव्हलपमेंट अंतर्गत विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात चांगले क्लासरूम, स्वच्छतागृहे, आरओचे पिण्याचे पाणी, वाचनालय या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

एच (H)- हॅपी स्कूल अंतर्गत खरेवाडी येथील शाळेत विविध पायाभूत सुविधांबरोबरच आधुनिक सुविधा, खेळणी, क्रीडा साहित्य, शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...