2 वर्षांनंतर वाङ्मयीन पुरस्कारांचे वितरण:सावानाच्या ग्रंथालय सप्ताहात प्रभावळकरांची मुलाखत, रामदार फुटाणे, अच्युत गाेडबाेलेंचाही संवाद
सार्वजनिक वाचनालय, नाशिकच्या ग्रंथालय सप्ताहात यंदा दिलीप प्रभावळकर यांची मुलाखत, रामदास फुटाणे, अच्युत गाेडबाेले यांच्यांचह मान्यवर संवाद साधणार आहेत.
साहित्य विषयक विविध कार्यक्रमांनी हा सप्ताह बहरणार असून याच वेळी 2019 आणि 2020 या दाेन वर्षांच्या वाङ्मयीन पुरस्कारांचे वितरणही करण्यात येणार असल्याचे सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 24-30 डिसेंबरपर्यंत मु. शं. औरंगाबादकर सभागृहात हे साहित्यमंथन हाेणार आहे.
सार्वजनिक वाचनाालयाच्या विविध कार्यक्रमांपैकी साहित्य रसिकांना उत्सुकता असलेला कार्यक्रम म्हणजे ग्रंथालय सप्ताह. या सप्ताहात विविध मान्यवरांशी रसिकांना संवास साधता येताे तसेच साहित्यावर विशेष मंथन हाेत असते.
शनिवार - 24 डिसेंबर
- ज्येष्ठ अभिनेते, लेखक दिलीप प्रभावळकर यांची मुलाखत अपर्णा वेलणकर आणि प्रा. अनंत येवलेकर घेणार आहेत.
रविवार - 25 डिसेंबर
- भारतीय राज्य घटनेला अभिप्रेत असलेला न्याय या विषयावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार हे संवाद साधणार आहेत.
सोमवार - 26 डिसेंबर
- ‘भारत कधी कधी माझा देश’ या विषयावर रामदास फुटाणे हे भाष्य करणार आहेत. याचेवळी उत्कृष्ट वाचक पुरस्कार, बी.लिब, एम.लिब विषयांत प्राविण्य मिळविणाऱ्यांचा सन्मान हाेणार आहे.
मंगळवार - 27 डिसेंबर
- अच्युत गाेडबाेले यांचे ‘माझा लेखन प्रवास’ या विषयावर व्याख्यान हाेणार आहे. याचवेळी 2019-20 वाङ्मयीन पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
बुधवार - 28 डिसेंबर
- सायंकाळी 6 ते 7 या वेळेत वाचक मेळावा हाेणार असून त्यानंतर खुली प्रश्न मंजूषा रंगणार आहे.
शुक्रवार - 30 डिसेंबर
- पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचे ‘जनजाती ; प्राचीन भारताचा वैभव संपन्न वासरा’ या विषयावर व्याख्यान हाेणार असून यावेळी आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी कार्यकर्त्याचा सन्मान केला जाणार आहे.
शनिवारी - 31 डिसेंबर
- ज्येष्ठ साहित्यिका नीरजा धुळेकर यांचे अभिव्यक्ती आणि सेन्साॅरशिप या विषयावर प. सा. नाट्यगृहात व्याख्यान हाेणार असून यावेळी 2020-21 या वर्षातील वाङमयीन पुरस्कारांचे वितरण हाेणार आहे. या सर्व कार्यक्रमांना साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष प्रा. फडके, प्रमुख सचिव डाॅ. धर्माजी बाेडके यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
असे आहेत पुरस्कार
- स्व. धनंजय कुलकर्णी (कादंबरी) : २०१९ - मनोज बोरगावकर (नादीष्ट), २०२० - ज्ञानेश्वर जाधवर (लॉक डाऊन)
- डॉ. वि. म. गोगटे पुरस्कार (ललितेतर ग्रंथ) : २०१९ - दीप्ती राऊत (कोरडी शेत... ओले डोळे), २०२० - प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे (विडीची गोस्ट)
- मु. ब. यंदे पुरस्कार (सामाजिक/वैचारिक ग्रंथ) : २०१९ - दीपक करंजीकर (घातसूत्र), २०२० - डॉ. जगन्नाथ पाटील (चंबुखडी ड्रीम्स)
- पु. ना. पंडीत पुरस्कार (लघुकथासंग्रह) : २०१९ - डॉ. विजय जाधव (अस्वस्त तांडा), २०२० - निलीमा भावे (विस्तारणारं क्षितीज)
- डॉ. अ. वा. वर्टी (उमेदीने लेखन) : २०१९ - संजय गोराडे (निर्णय) , २०२० - मनोहर सोनवणे (ब्रॅंड फॅक्टरी)
- अशोक देवदत्त टिळक (चरित्रात्मक कादंबरी) : २०१९ - अनिता पाटील (द्रष्टा अनुयांत्रिक), २०२० - मंजूश्री गोखले (समर्पण)
- ग. वि. अकोलकर (शैक्षणिक/वैचारिक) : २०१९ - रवी वाळेकर (इंडोनेशायन), २०२० - ओंकार वर्तले (प्रेक्षणीय महाराष्ट्राची भटकंती)
- वि. दा. सावरकर (अनुवाद) : २०१९ - सुलक्षणा महाजन, करुणा गोखले (तुम्ही बी घडा ना), २०२० - मुकुंद वझे (बिहांड दी सिन्स)