आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रंथप्रदर्शन:साहित्य वा काेणतेही पुस्तक हे घडवितात मस्तक ; कवी राजेंद्र साेमवंशी यांचा संवाद

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावे, बौद्धिक व सामाजिक विकास व्हावा या उद्देशाने विद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्यावतीने नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या उंटवाडी माध्यमिक विद्यालयात ग्रंथ सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी राजेंद्र सोमवंशी हे उपस्थित होते.

प्रमूख पाहुणे सोमवंशी सर यांनी आपल्या मनोगतातून साहित्य वा काेणतेही वाचनिय पुस्तक हे मस्तक घडवित असते असे सांगत स्त्री शिक्षणाविषयी स्वरचित कविता गीत चला शिकाया चल गं सरू आता नकोस मागे फिरू ही कविता सादर केली व विद्यार्थी पुस्तक वाचनाविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शालेय ग्रंथपाल अर्चना देवरे यांच्या सहकार्याने शालेय परिसरात ग्रंथदिंडी तसेच पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले हाेते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका नंदिनी कहांडळ यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रशांत केंदळे यांनी करून दिला. शालेय गीत मंचाने स्वागतगीत सादर केले. संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांनी विद्यार्थ्यांना या महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या. ग्रंथपाल अर्चना देवरे यांनी ग्रंथोत्सवाचे निवेदन केले. विद्यार्थिनी नेत्रा कुलकर्णी हिने हिंदी कविता सादर केली तर पल्लवी भामरे, गौरी आहिरे, लोकेश माळी यांनी साहित्य प्रकारविषयी माहिती सांगितली.

याप्रसंगी स्काऊट गाईड विभागाच्या वतीने खरी कमाई उपक्रमांतर्गत खाऊचे स्टॉल लावण्यात आले होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन मंगला मुसळे यांनी केले तर आभार रवींद्र नाकील यांनी मानले. याप्रसंगी मुख्याध्यापिका नंदिनी कहांडळ, उपमुख्याध्यापिका राजश्री चंद्रात्रे, पर्यवेक्षक रवींद्र हात्ते, साहेबराव राठोड, संस्था सहकार्यवाह तथा शिक्षक प्रतिनिधी विजय मापारी, पालक-शिक्षक संघ उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, सहसचिव सखाराम कासव सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...