आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्ज:युवकांना व्यवसायासाठी 50 लाखांपर्यंत कर्ज, अर्जाची संधी

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युवकांना रोजगार, स्वत:चे व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमइजीपी) व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (सीएमइजीपी) अंतर्गत खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

ग्रामीण भागातील युवकांना उद्योजक बनविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासाठी http://www.pmegp.online/ या संकेतस्थळावर आॅनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे. या अंतर्गत उत्पादन क्षेत्रासाठी ५० लाख, सेवा क्षेत्रासाठी २० लाखांचे कर्ज देणार दिले जाते.. तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत १० लाख आणि २५ लाखांचे कर्ज दिले जाते. अधिक माहितीसाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा.

बातम्या आणखी आहेत...