आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:लॉकडाऊनची पूर्वतयारी; आजपासून सकाळी 10 ते 5 दुकाने उघडणार, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरची माहिती

नाशिक2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊनचे सूतोवाच राज्य सरकारने केले असले तरी अद्याप त्याचा अधिकृत निर्णय न झाल्याने राज्यभरात संभ्रमावस्था आहे. येत्या दोन-तीन दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लागण्याची शक्यता असल्याने तत्पूर्वी विविध पूर्तता करण्यासाठी राज्यातील व्यापारी सोमवारी (दि. १२) आपली दुकाने, व्यापार सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू करतील, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. राज्य सरकारचा निर्णय रविवारी (दि. ११) सायंकाळपर्यंत येईल अशी अपेक्षा होती. परंतु सरकारने कोणताही स्पष्ट निर्णय जाहीर केला नाही. वर्षाखेरनंतरच्या सरकारी कामकाजाची पूर्तता तसेच अन्य बाबींची तयारी लॉकडाऊनपूर्वी करणे गरजेचे आहे. त्यामुळे सोमवारपासून राज्यातील व्यापारी दहा ते पाच या मर्यादित वेळेत आपले व्यापार सुरू करणार आहेत.

मास्कशिवाय प्रवेश नको; व्यापाऱ्यांना सूचना
मास्कशिवाय ग्राहकांना प्रवेश देऊ नये, फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन या बाबींचे कसोशीने पालन करावे. दुकानदाराने स्वतः तसेच आपल्या कामगारांच्याही कोरोना तपासण्या करून घ्याव्यात तसेच लसीकरणसुद्धा लवकरात लवकर करून घ्यावे, असेही आवाहन चेंबरने राज्यातील सर्व व्यापाऱ्यांना केले आहे.

बातम्या आणखी आहेत...