आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय घ्या, नाहीतर दुकान उघडतो:​​​​​​​लॉकडाऊन शिथिल न केल्यास 1 जूनपासून दुकाने उघडणार; व्यापारी संघटनांचा शासनाला इशारा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनदरम्यान व्यापाऱ्यांना 70 हजार कोटींचा फटका

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ५ एप्रिलपासून लावलेल्या लॉकडाऊनम‌ुळे राज्यातील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांचे सुमारे ७० हजार कोटींचे नुकसान झाले. शासनाने ज्या-ज्या वेळी आवाहन केले तेव्हा व्यापाऱ्यांनी त्यास साथ दिली. त्यामुळे आता राज्यात जेथे परिस्थिती नियंत्रणात आहे अशा ठिकाणी व्यापार सुरू करण्यास परवानगी द्यावी, अन्यथा १ जूनपासून आम्ही स्वतः दुकाने उघडू असा इशारा पुणे,नाशिक, सोलापूरसह राज्यातील व्यापारी संघटनांनी राज्य शासनाला दिला आहे.

राज्यातील ७ लाख व्यापाऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या किराणा व्यावसायिकांना तर साधे लसीकरणात देखील समाविष्ट करून घेतले गेलेले नाही. याबद्दल व्यापाऱ्यांमध्ये असंतोष खदखदतो आहे. महत्त्वाचे म्हणजे कामगारांचा पगार, सरकारचे कर, वीज बिल अशा एक ना अनेक समस्या व्यावसायिकां समोर उभ्या असून राज्य सरकारकडून अद्याप दिलासाही दिला गेलेला नाही. यामुळेच आता व्यापारी निर्णायक भूमिकेत आल्याचे चित्र राज्यभरात पाहावयास मिळत आहे.

आता तरी सरकारने गांभीर्याने घ्यावे
प्रदीर्घ काळ चाललेल्या लॉकडाऊनमध्ये व्यापारी पोळला आहे. पुण्यातील व्यापाऱ्यांप्रमाणे संपूर्ण राज्यातील व्यावसायिकांची मानसिकता सध्या पाहायला मिळते आहे. त्यामुळे शासनाने याचा आता तरी दुकाने सुरू करण्यासंदर्भात गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. संतोष मंडलेचा, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स

भौगोलिक परिस्थिती पाहून निर्णय घ्या
आजची परिस्थिती पाहता शहरांमध्ये रुग्ण संख्या अत्यंत कमी झाली आहे मात्र ग्रामीण भागामध्ये रुग्ण संख्या अधिक आहे. याचा गांभीर्याने विचार करून भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात निर्णय शासनाने घेणे गरजेचे आहे. शासनाने निर्णय घेतला नाही तर आम्हा व्यापाऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल हे खरे आहे. - राजू राठी ,अध्यक्ष, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स

निर्णय घ्या, नाहीतर दुकान उघडतो
आज राज्यात बारा जिल्ह्यांत परिस्थिती बिकट आहे. तेथे जरूर निर्बंध असावेत, मात्र जेथे परिस्थिती सामान्य आहे तेथेही निर्बंध चुकीचे आहे. कामगारांचे पगार, सरकारी कर यासारख्या अनेक गोष्टी कशा अदा करायच्या या विवंचनेत आता व्यापारी आहेत. यामुळे दुकाने उघडायचा निर्णय सरकारने घ्यावा,अन्यथा आम्हीच १ जूनपासून दुकाने उघडू. -पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष, पुणे मर्चंट चेंबर

बातम्या आणखी आहेत...