आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सप्त मोक्षपुरी सायकलिंग’:लाेहार पितापुत्रांचा अयोध्या, मथुरा, हरिद्वार, काशी, कांचीपुरम, उज्जैन व द्वारका सायकल प्रवास

सिडको2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनचे संचालक व नाशिक महापालिकेच्या शाळेत शिक्षक असलेले गणेश लोहार व त्यांचे पुत्र अथर्व व वेदांत लोहार यांनी सप्त मोक्षपुरी ही ७ हजार किलाेमीटरची सायकलयात्रा पूर्ण केली. नाशिकच्या काळाराम मंदिरापासून सुरू झालेल्या यात्रेचा नाशिकमध्येच समाराेप झाला.

भारतीय संस्कृतीत अयोध्या, मथुरा, हरिद्वार, काशी, कांचीपुरम, उज्जैन व द्वारका ही सात मोक्षदायिनी नगरे म्हणजेच मोक्षपुरी मानल्या आहेत. प्रत्येक नगरीचा एक पवित्र व ऐतिहासिक वारसा आहे. यामुळे लाेहार यांनी या सात ठिकाणी सायकलवर यात्रा केली. यापूर्वीही त्यांच्या कामगिरीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व वज्र बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

४ नाेव्हेंबर ते १४ डिसेंबरदरम्यान अशी झाली सायकल मोहीम नाशिकच्या काळाराम मंदिर येथून दि. ४ नाेव्हेंबरला सप्तमोक्षपुरी यात्रा सुरू झाली. ७ हजार कि.मी.ची सायकलिंग मोहीम बुधवारी (दि. १४) यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. भारतीय संस्कृती, योग व पर्यावरणपूरक जीवनशैली यांचा प्रचार व प्रसार करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. लोहार पिता-पुत्रांनी पहिल्यांदाच ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. खडतर अशा सप्त मोक्षपुरीची मोहीम त्यांनी ११ राज्यांमधून विविध शाळा-महाविद्यालयांना भेटी देऊन भारतीय संस्कृती, योग व पर्यावरणपूरक जीवनशैली याविषयी माहिती दिली.

थंडी, ऊन, पाऊस अशा तिन्ही वातावरणात सायकल यात्रा ^सायकल यात्रा सुरू झाली तेव्हापासूनच बदलते वातावरण हाेते. मात्र त्यावर मात करत कितीही अडचणी आल्या तरी ही सायकल यात्रा पूर्ण करायचीच असा आम्ही निर्धार केला आहे. अनेक ठिकाणी रात्री थंडी, दुपारी ऊन तर काही ठिकाणी पाऊस असे सर्वच प्रकारचे वातावरण अनुभवताना कसरत करावी लागत होती. मात्र, इच्छाशक्ती तिथपर्यंत घेऊन गेली व यात्रा यशस्वी झाली. या काळात पर्यावरणाचा संदेश देत आम्ही विविध ठिकाणी जनजागृती केली. विविध शाळांना भेटी दिल्या. शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना प्लास्टिकमुक्ती, झाडे लावा - झाडे जगवा याबद्दल मार्गदर्शन केले. आम्हाला भेटलेल्या लाेकांनीही उत्स्फूर्त स्वागत करत आमचे ऐकून घेतले आणि पर्यावरण जागृतीबाबत प्रतिसादही दिला. - गणेश लाेहार, सायकलिस्ट

बातम्या आणखी आहेत...