आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Longest Sentence Formation Success In Such Forms; Five year old Kyra Won 2 Gold Medals At The National Skating Championships |marathi News

सुवर्णपदके:लाँगेस्ट सेंटेन्स फॉर्मेशन अशा प्रकारांमध्ये यशस्वीरित्या कामगिरी; पाच वर्षीय कायराला राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत 2 सुवर्णपदके

नाशिक12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील रविवार पेठ भागातील रहिवासी महेंद्र भागचंद बुरड यांची नात कायरा मयूर बुरड या पाच वर्षीय चिमुकलीने राष्ट्रीय स्केटिंग प्रकारात दोन सुवर्णपदके मिळविली. विशेष म्हणजे, गत सात महिन्यांत कायराने अनेक राज्यांत झालेल्या स्केटिंगच्या स्पर्धेत तीन विश्व रेकॉर्डसह ३३ पदके प्राप्त केली असल्याचे तिच्या कुटुंबियांनी सांगितले.

बेळगाव (कर्नाटक) येथे ९६ तास रिले स्केटिंग आणि लाँगेस्ट सेंटेन्स फॉर्मेशन अशा प्रकारांमध्ये यशस्वीरित्या कामगिरी करत कायरा हिचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. गोवा स्केटिंग फेस्टिव्हल राष्ट्रीय स्पर्धेत अंडर - ६ वयोगटात शॉर्ट रेस आणि लाँग रेसमध्ये २ सुवर्णपदकांची कमाई केली. तिच्या यशस्वी कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय ओपन रोलर टुर्नामेंट, इंडोनेशियासाठी तिची निवड झाली आहे. स्पर्धेत ती देशाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती अमृता बुरड यांनी दिली. कायरा हिने पहिले रेकॉर्ड २६ जानेवारीला केले. या विश्वविक्रमानंतर तिने मागे वळून न बघता विविध स्पर्धेत सुवर्ण, राैप्य आणि कांस्यपदक मिळविले. तिला प्रशिक्षक विजयमल यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.

बातम्या आणखी आहेत...