आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:‘बीएमडब्ल्यू’ची ऑनलाइन किंमत पाहणे दोघांना पडले 10 लाखांत!

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीएमडब्ल्यू कंपनीमध्ये असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट असल्याचे भासवत बीएमडब्ल्यू २ सिरीज ही कार मूळ किमतीच्या ५५ टक्के कमी दरात घेऊन देण्याचे आमिष देत शहरातील दोघा व्यावसायिकांना १० लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी संशयित अमितकुमार घोष या तोतयाच्या िवरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चेतन प्रभू (रा. शंकरनगर, गंगापूररोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ११ एप्रिल रोजी घरी असताना अनोळखी नंबरवरून फोन आला. बीएमडब्ल्यू कंपनीचा व्हाइस प्रेसिडेंट असल्याचे संशयिताने सांगितले. साऊथ ईस्ट आशियात कार सेल करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, असे सांगत विश्वास संपादन केला. तुम्ही बीएमडब्ल्यू २ सिरीज कार घेण्याच्या विचारात आहात असे समजले. तुम्ही खरोखर इच्छुक असाल तर ५५ टक्के कमी दरात कार मिळवून देतो असे सांगितले. याकरिता आपणास आगाऊ बुकिंग करावी लागेल असे सांगत एचडीएफसी, आयसीआयसीआय बँकेचा खाते नंबर दिले. प्रभू हे कार घेण्यास इच्छुक असल्याने त्यांनी संशयितांनी दिलेल्या खात्यात आरटीजीएसद्वारे ५ लाखांची रक्कम अकाउंट टू अकाउंट ट्रान्सफर केली. कार बुकिंग झाल्याबाबत काहीच माहिती मिळत नसल्याने संशयिताला फोन केला, मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. माहिती घेतली असता संशयिताने कुमार दाणा या व्यावसायिकालाही अशाच प्रकारे ४ लाखांची रक्कम खात्यात आॅनलाइन भरण्यास सांगितली. संशयिताची पत्नी बिपाशा भौमिक हिला ५० हजार आरटीजीएस आणि ५० हजार रोख दिले होते. त्यांचीही फसवणूक झाल्याचे समजले. वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

कार घेण्यास इच्छुक होताहेत लक्ष्य उत्सवकाळात वाहन खरेदी अधिक प्रमाणात होते. या काळात कारबाबत माहिती घेणाऱ्यांची संख्या अधिक असते. प्रभू आणि दाणा यांनी बीएमडब्ल्यू कार खरेदी करण्यासाठी कंपनीच्या शोरूममध्ये आणि आॅनलाइन माहिती घेतली होती. याचा फायदा घेत संशयिताने या दोन्ही ग्राहकांशी संपर्क साधून त्यांना गंडा घातल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...