आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग:सातव्या दिवशीच्या महोत्सवाला भगवान विमलनाथ; आंतरराष्ट्रीय योगदिनी जुळला महामस्तकाभिषेकाचा योग

नाशिक4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या योगावर भगवान ऋषभदेवांच्या महामस्तकाभिषेकाचा योग जुळून आल्याने आम्ही धन्य झाल्याची भावना महोत्सव समितीचे कोषाध्यक्ष प्रमोदकुमार कासलीवाल यांनी व्यक्त केली. सातव्या दिवशीच्या महोत्सवाला भगवान विमलनाथ यांच्या मोक्षदिनाचे औचित्य लाभले. पवित्र वातावरणात व उत्साहात भगवान ऋषभदेवांच्या १०८ फूट उंच अखंड पाषाण मूर्तीवर पंचामृत महामस्तकाभिषेक झाला.

पंचामृत कलशाचा मान मंगळवारी (दि. २१) औरंगाबादचे प्रमोदकुमार व सुनीता कासलीवाल, त्यांचे वृषभकुमार, नमिता, संकेत, छायादेवी, इंदरचंद बाकलीवाल, अंकिता व प्रणयकुमार, किरणदेवी व शैलेंद्रकुमार व कासलीवाल परिवाराने मिळवला. यावेळी त्यांचे नातेवाइक डॉ. अनिता व अनिल बिनायके, सरोज व चेतन, केतन ठोळे उपस्थित होते. महामस्तकाभिषेकाच्या प्रारंभी संकल्प, प्रार्थना यांचे पौरोहित्य हस्तिनापूरचे प्रधान आचार्य विजय जैन, सांगलीचे दीपक पंडित व सत्येंद्र जैन यांनी केले. महामस्तकाभिषेक सोहळ्याच्या सातव्या दिवशी गणिनीप्रमुख श्री ज्ञानमती माताजी व प्रज्ञाश्रमणी आर्यिका श्री चंदनामती माताजी यांचे स्मरण करून श्रीफल अर्पण करण्यात आले. स्वामीजी रवींद्रकीर्ती महाराजांनी प्रास्ताविकात शुभाशीर्वाद दिले. महामंत्री संजय पापडीवाल, अधिष्ठाता सी. आर. पाटील, राजेंद्र कासलीवाल, अशोक दोशी व्यासपीठावर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...