आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहित प्रेयसीवर प्रियकराचा प्राणघातक हल्ला:गुन्हेगारी कुंडली समजल्यानंतर तिने सोडली साथ; म्हणून कोयत्याने केले सपासप वार

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकमध्ये विवाहित महिलेसोबत प्रेमसंबध असलेल्या तरुणाने प्रेयसीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला करत महिलेला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुवार दि.25 रोजी पाथर्डी गाव परिसरातील एका पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला. दरम्यान महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

महिलेला केली मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा (वय 37) ( नाव बदलले आहे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पाथर्डी गावात एका पंपावर काम करते. संशयित प्रदिप गोसावी याच्या सोबत दिड वर्षापासून प्रेमसंबध होते. संशयित गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याने त्याच्या सोबत राहण्यास महिला त्यास नकार देत होती. याचा राग आल्याने संशयिताने पंपावर येऊन वाद घातला. वाद घालत मारहाण केली. कमरेला लावलेला कोयत्याने पायावर हल्ला केला. या हल्ल्यात महिलेच्या पायावर गंभीर दुखापत झाली. पंपावरील इतर कमागारांनी जखमी महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त विजय खरात, वरिष्ठ निरिक्षक संजय बांबळे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

घोटी येथे होते पुर्वी वास्तव्य

महिलेच्या पतीचे सहा वर्षापुर्वी निधन झाले आहे. घोटी येथे वास्तव्यास असतांना येथील राहणारा संशयित बैरागी सोबत प्रेमसबंध जुळले. साधरण एक वर्षापर्वी संशयितावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हा पासून तो कारागृहात होता. महिले त्याच्या पासून सुटका करण्यासाठी मुंबई येथे राहण्यास गेली होती. संशयित कारागृहातून सुटल्यानंतर महिलेला त्रास देत होता. काही दिवसांपुर्वी महिला पाथर्डी गावात राहण्यास आली होती.एक महिन्यापासून ती पंपावर काम करत होती.

वर्दळीच्या ठिकाणी घटना

संशयिताने पेट्रोल पंपावर महिलेवर हल्ला केला. पंपावरील कामगारांनी महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र हातात कोयता असल्याने त्याला पकडण्याची हिम्मत कोणी केली नाही. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

संशयित फरार

हत्याराने हल्ला करून संशयित फरार झाला. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...