आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी प्रश्न साेडविण्याची मागणी:कामटवाडे परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा; संतप्त महिलांचा माजी नगरसेवकांना घेराव

सिडकाे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडकोतील कामटवाडे, इंद्रनगरीसह परिसरातील जवळपास २० हजारांहून अधिक लाेकसंख्येच्या रहिवासी भागात काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा हाेत आहे. याबाबत परिसरातील महिलांनी शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना घेराव घालत पाणी प्रश्न साेडविण्याची मागणी केली.

अंबड लिंक राेडवरील इंद्रनगरी, कामटवाडे येथील आशीर्वाद पार्क, अमृतनंदन रो-हाऊस, श्रीपाद रो हाऊस, गजानन महाराज चौक, सखाराम साेसायटी, निशांत एक ते चार साेसायटी एकदंत चाैक भागात एेन पावसाळ्यातच अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने परिसरातील रहिवाशांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची प्रथमच वेळ आली आहे.

याबाबत मनपा प्रशासनाकडे व परिसरातील माजी नगरसेवकांकडे वारंवार तक्रारी करूनही समस्या सुटत नसल्याचा आराेप महिलांनी केला आहे. यासंदर्भात, परिसरातील रहिवाशी गायत्री फेगडे, मंगला बागडणे, मीरा श्रीरसागर, संगीता जाधव, मंगला शिंदे, हर्षदा पाटील,स्वाती सोनी आदींनी एकत्रितपणे माजी नगरसेवक बडगुजर यांची भेट घेऊन निवेदन देत पाण्याची समस्या मांडली. यावर तातडीने उपाययाेजना न केल्यास तीव्र आंदाेलनाचा इशाराही दिला. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने हा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रयत्न केेले जातील, असे आश्वासन बडगुजर यांनी दिले.

नाशिकराेडला मागील सप्ताहापासून कमी दाबाने पाणीपुरवठा
जय भवानी राेड, सदगुरूनगर, आर्टिलरी सेंटर राेड, उपनगर भागात कमी दाबाने पाणीपुरवठा हाेत असल्याने महिलांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत महिलांनी गेल्या आठवड्यातच हंडा माेर्चा काढत मनपा प्रशासनाचा निषेध नाेंदविला. याही भागात अद्याप अशीच परिस्थिती कायम आहे.

बातम्या आणखी आहेत...