आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा विस्कळीत:शहरात आज कमी दाबाने पाणीपुरवठा

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर धरण येथील महापालिकेच्या वॉटर पंपिंग स्टेशन येथील वीजपुरवठा करणाऱ्या उपकेंद्रात बिघाड झाला आहे. त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. याच्या दुरुस्तीसाठी बुधवारी (दि. ३) सकाळी कमी दाबाने शहरात पाणीपुरवठा होणार असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जाहीर केले आहे.

गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथील ए टाइप पंपाची मेन कॉमन हेडर लाइन अचानक दुपारी लिकेज झाली असल्याने तातडीने दुरुस्तीकरिता मंगळवारी दुपारी २.०० ते ५.०० या कालावधीत पंपीग बंद करण्यात आलेले होते. त्यामुळे बुधवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...