आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक दिंडोरी तालुक्यातील ढकांबे येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लहान मुलांना बंदुकीचा धाक दाखवत शेतकऱ्याच्या घरातून जवळपास 70 तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. या हा घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
दरोड्यानंतर चोरट्यांना घरात सीसीटीव्ही असल्याचे समजले. तेव्हा ते जाता - जाता सीसीटीव्हीचे हार्ड डिस्क आणि दारातली क्रेटा गाडीही घेऊन गेल्याचे घरमालकाने सांगितले.
नाशिक शहर व परिसरात दरोड्याची ही मोठी घटना असून, चारच दिवसांपूर्वी नांदुर-शिंगोटे येते धाडसी दरोडा टाकून दहा ते पंधरा लाखांचा ऐवजी कळविला होता. त्या पाठोपाठ ही घटना घडल्याने ग्रामीण भागातील मळे परिसरात राहणाऱ्या शेतकरी, व्यापारी वर्गामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाशिक - दिंडोरी या 24 तास वर्दळ असणाऱ्या रस्त्यालगतच ढकांबे येथे घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दरोड्याची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे व कर्मचारी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पाठीच्या सुमारास घडलेल्या या दरोड्याप्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी तातडीने घटनास्थळी श्वान पथक प्रचारण करण्यात आले मात्र काही धागे हाती लागले नाही.
बोडके यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य झोपेत होते. तेव्हा चोरट्यांनी दरोडा टाकला. त्यांनी आतील कपाटातून दागिने काढत असताना आवाज झाला. त्यामुळे घरातील सगेळच जागे झाले. त्यांनी आरडाओरड सुरू केली. तोच दरोडेखोरांनी धारधार शस्त्रे, बंदुकीचा धाक दाखवला. लहान मुलांच्या अंगावर बंदूक लावून सोने, चांदी दागिने व काही रोकड ताब्यात घेतली. त्या पाठोपाठ सीसीटीव्ही कॅमेऱ्याची हार्ड डिस्क देखील सोबत घेऊन पोबारा केल्याचे घरमालकाने सांगितले. यामुळे पोलिस यंत्रणेसमोर दरोडेखोरांचे शोध घेण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.