आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:विमा पाॅलिसीची पूर्ण रक्कम परत‎ देण्याचे आमिष; 50 हजारांचा गंडा‎

नाशिक‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विमा कंपनीत विमा काढताना विमा रकमेचे‎ दोन हप्ते भरल्यास पॉलिसीची पूर्ण रक्कम‎ काढता येईल असे आमिष देत बँकेत ५०‎ हजार रुपये भरण्यास भाग पाडत गंडा‎ घातल्याचा प्रकार उघडकीस आला.‎ याप्रकरणी संशयिताच्या विरोधात मुंबई नाका‎ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला‎ आहे.‎ पोलिसांनी दिलेली माहिती आणि‎ नवलचंद जैन रा. अशोका मार्ग यांनी दिलेल्या‎ तक्रारीनुसार, घरी असताना अनोळखी‎ नंबरहून फोन आला.

एका लाइफ इन्शुरन्स‎ कंपनीचा प्रतिनिधी बोलत असल्याचे‎ सांगितले. कंपनीची पॉलिसी घेतल्यास त्याचे‎ दोन हप्ते भरल्यास पॉलिसीची संपूर्ण रक्कम‎ काढण्यात येईल असे आमिष दिले. जैन यांनी‎ संशयिताने दिलेल्या बँक खात्यात ५० हजार‎ रुपये भरले. संशयिताने पॉलिसी रक्कम‎ भरल्याचे बनावट पत्र आणि पावती पाठवली.‎ संबंधित कंपनीच्या कार्यालयात माहिती‎ घेतली असता अशा प्रकारे कुठलाही प्लॅन‎ नसल्याचे सांगण्यात आले. वरिष्ठ निरीक्षक‎ चंद्रकांत आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली‎ तपास सुरू आहे. नागरिकांनी अशा‎ आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन‎ सायबर पाेलिसांकडून करण्यात येत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...