आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षासाठी ‘एम.फिल इन सायकॅट्रिक सोशल वर्क’ या अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ५ ऑगस्टपर्यंत आहे.
एम.फिल इन सायकॅट्रिक सोशल वर्क अभ्यासक्रमाला नवी दिल्ली येथील भारतीय पुनर्वसन परिषद यांची मान्यता आहे. विद्यापीठ संलग्न पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेज येथील ससून हॉस्पिटल कॅम्पस येथे महाराष्ट्र मेंटल हेल्थमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.
विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थी व संबंधितांसाठी www.muhs.ac.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. त्यात शैक्षणिक पात्रता, नांेदणी शुल्क, प्रवेश क्षमता, आरक्षण, परीक्षेचे स्वरूप, नियमावली, प्रवेश अर्ज इत्यादी माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. एम.फिल इन सायकॅट्रिक सोशल वर्क याबाबत अधिक माहितीसाठी संपर्क : २५३-२५३९१९६ किंवा ०२५३-२५३९२०६ दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.