आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन वार्ता:शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माधवराव मोरे यांचे निधन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते, शेतकऱ्यांचे मार्गदर्शक, शेतकरी संघटनेच्या चळवळीतील त्रिमूर्तींपैकी एक आणि बुलंद तोफ असलेले पिंपळगाव बसवंत येथील माधवराव (नाना) खंडेराव मोरे (८८) यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी (दि.३) सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

माधवराव मोरे यांनी १९८० ते ८१ च्या काळात शरद जोशी यांच्या सोबतीने संघटनेची स्थापना करून शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळावा, कृषिमूल्य आयोग बरखास्त करा, कांद्याला मंदी तर उसाला बंदी या मागण्यांसाठी राज्यात आंदोलन उभे केले होते. राज्यात जोशी व मोरे यांच्या नेतृत्वाखाली रेल रोको, रास्ता रोको आंदोलने करण्यात आली होती. लाखोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. या आंदोलनाची दखल बीबीसीसारख्या परदेशी वृत्तसंस्थेनेही घेतली होती. आंदोलन चिरडण्यासाठी सरकारकडून लाठीमार, अश्रुधूर, हवेत गोळीबार करण्यात आला होता. या लाठीमारात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. तत्कालीन मुख्यमंत्री अ. र. अंतुले यांनी शरद जोशी, माधवराव मोरे, तात्यासाहेब बोरस्ते यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले होते‌.

बातम्या आणखी आहेत...