आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:भरवज निरपण येथे महा राजस्व अभियान, विविध दाखल्यांचे वाटप

घोटी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी तालुक्यातील कांचनगाव परिसरातील भरवज, निरपण व काळुस्ते या गावांमध्ये शासन आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत भव्य महा राजस्व अभियान झाले. खासदार हेमंत गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली हे अभियान घेण्यात आले असून यावेळी विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले होते. आयोजन शिंदे गटाचे बाळा गव्हाणे यांनी केले होते. व्यासपीठावर संपर्क प्रमुख जयंत साठे, सहसंपर्क प्रमुख काशीनाथ मेंगाळ, जिल्हाध्यक्ष अनिल ढिकले, उपजिल्हाप्रमुख रघुनाथ तोकडे, तालुकाप्रमुख संपत काळे, बाळा गव्हाणे, देविदास जाधव, सरपंच जाईबाई भले, तहसीलदार परमेश्वर कासुळे, सहायक गटविकास अधिकारी भुसारे, संपत डावखर, सतीश गव्हाणे, सपन परदेशी, नितीन गव्हाणे आदी उपस्थित होते. खासदार गोडसे म्हणाले की, इगतपुरी तालुका हा आदिवासी बहुल आहे.

बातम्या आणखी आहेत...