आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:महाज्योती नेट-सेट प्रशिक्षणार्थींना यूपीएससीनुसार हवा आकस्मिक निधी

नाशिक4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अोबीसी विद्यार्थ्यांची नाजूक आर्थिक परिस्थिती लक्षात घेता महाज्योतीने पीएच.डी., एमपीएससी-यूपीएससी या प्रशिक्षणार्थींसाठी देण्यात येणारी आकस्मिक निधीची योजना नेट-सेटच्या प्रशिक्षणार्थींसाठी लागू करावी. राज्यातील विविध भागांतून पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील १५ हजार रुपये आकस्मिक निधी द्यावा, अशी मागणी अ. भा. विद्यार्थी परिषदेने केली आहे.

महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) वतीने स्पर्धापूर्व परीक्षांसाठी दिल्ली, पुणे व इतर ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहेत. त्यात पुणे येथे नेट-सेट स्पर्धापूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे. यात विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, अमरावती बुलडाणा, अकोला तर वर्धा आणि नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, रत्नागिरी येथून विद्यार्थी पुण्यात दाखल होतात. ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रशिक्षणासाठी पुण्यात गेल्यावर खोली भाडे, मेस यासाठी पैसे नसल्याने अडचणी निर्माण होतात.

त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध प्रशासकीय सेवांच्या स्पर्धापूर्व प्रशिक्षण मोफत मिळावे, स्टायपेंड दिला जावा या प्रमुख उद्देशाने सुरू केलेल्या महाज्योतीद्वारे आता नेट-सेट अभ्यासक्रमांसाठी राज्यातील विविध भागांतून पुण्यात दाखल होणाऱ्या गरीब ओबीसी विद्यार्थ्यांनाही आकस्मिक निधी देण्यापासून वंचित ठेवणे हा पक्षपात होईल, असे याबाबतच्या निवेदनात म्हटले असून या निधीची मागणी राज्याच्या विविध भागातील ओबीसी विद्यार्थ्यांनी आणि महाज्योतीचे माजी संचालक दिवाकर गमे यांनी समाजकल्याणमंत्री व महाज्योतीच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...