आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऋषभदेवांचा महामस्तकाभिषेक:मांगीतुंगीमध्ये उद्यापासून भगवान ऋषभदेवांचा महामस्तकाभिषेक, देश-विदेशातील पाच लाख भाविकांची उपस्थिती

नाशिक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखंड पाषाणात कोरलेल्या जगातील एकमेव १०८ फुटी भगवान ऋषभदेव यांच्या मांगीतुंगी येथील मूर्तीचा उद्यापासून (दि. १५) आंतरराष्ट्रीय महामस्तकाभिषेक महोत्सव साजरा केला जाणार आहे. ६ वर्षांनंतर पहिल्यांदाच हा महोत्सव होत असून येथून पुढे कुंभमेळ्याप्रमाणेच दर सहा वर्षांनी महोत्सव होणार असल्याची माहिती महामस्तकाभिषेक सोहळ्याचे अध्यक्ष तथा पीठाधीश रवीन्द्रकीर्ति स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी देशभरातून ५ लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्र शासनाचे व पालकमंत्री छगन भुजबळ यांचे सहकार्य मिळत आहे. कार्यक्रमासाठी शासनस्तरावर पाणी, रस्ते, वीज यासाठी सहकार्य केले जात असल्याचे महामस्तकाभिषेक सोहळ्याचे अध्यक्ष पीठाधीश रवींद्रकीर्ति स्वामी यांनी सांगितले. महोत्सवासाठी ऋषभदेवपूरम मांगीतुंगी येथे येणाऱ्या यात्री व भक्तगणांसाठी अॅटॅच कॉटेज रूम्स निर्माण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ऋषभदेवपूरम परिसरात १०० सुपर डिलक्स खोल्या असलेली सात मजली धर्मशाळा तयार आहे. यासाठी वॉटरप्रूफ मंडप, भोजनालय, साधू संतांसाठी व्यवस्था करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...