आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामस्तकाभिषेक:भगवान ऋषभदेव यांना एक हजार लिटर पंचामृतचा महामस्तकाभिषेक

मांगीतुंगी19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मांगीतुंगी (जि.नाशिक) | येथील भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फुटी उंच मूर्तीच्या आंतरराष्ट्रीय महामस्तकाभिषेक सोहळ्यास बुधवारी प्रारंभ झाला. सहा वर्षांनंतर देश-विदेशातील भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे.

सोहळ्यापूर्वी ऋषभदेवपुरम येथून ढोल-ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. पोलिस बँडनेही या वेळी सलामी दिली. पंचामृत कलशात हजार लिटर दूध, नारळपाणी, उसाचा रस, तूप, दूध, दही, केसर, सर्वौषधी, हरिद्रा, रक्तचंदन, श्वेत चंदन, केशर, सुगंधी फुले,अष्टगंध, यांचा समावेश करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...