आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:नाशिकमध्ये महाराणा प्रताप सिंह यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने महाराणा प्रताप सिंह यांची जयंती विविध उपक्रमांद्वारे साजरी करण्यात आली. महाराणा प्रताप हे राजस्थानचे असलेली तरी महाराष्ट्रात ही त्यांचा जन्मदिवस मोठ्या आनंदात साजरा केला जातो. वीरता, हुशारी आणि धाडसासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराणा प्रताप यांचे नाव इतिहासाच्या पानांवर कोरले गेले आहे

याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे, राजेंद्र बागुल, सेवादलाचे शहराध्यक्ष डॉ. वसंत ठाकूर माजी नगरसेविका वत्सला ताई खैरे अनुसूचित जाती-जमाती प्रदेश सचिव सुरेश मारू महिला काँग्रेसच्या अध्यक्ष स्वाती जाधव बबलू खैरे संतोष मुन्ना ठाकूर राजकुमार जीप शफिक काजी जगदीश वर्मा धोंडीराम बोडके सिद्धार्थ गांगुर्डे शैलेश तांबोळी मिलिंद वाबळे राजू पाटील सुधीर पवार विनायक ठाकूर बाळासाहेब कदम हेमंत परदेशी आदी उपस्थित होते.

महाराणा प्रताप यांच्याबद्दल

महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे 1540 रोजी एका राजपूत घराण्यात झाला. त्यांचे वडील उदय सिंह द्वितीय हे मेवाड वंशांचे 12 वे राज्यकर्ते आणि उदयपूरचे संस्थापक होते. महाराणा प्रताप यांना तीन भाऊ आणि दोन सावत्र बहिणी होत्या. महाराणा प्रताप यांना 11 पत्नी आणि 17 अपत्ये होती. महाराणा प्रताप यांच्यानंतर महाराणा अमर सिंह प्रथम हे त्यांचे उत्तराधिकारी बनले. तर 1597 साली शिकार करायला गेलेल्या महाराणा प्रताप यांचा अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...