आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

वयाच्या 68 व्या वर्षी असा उत्साह:जगातील सर्वात धोकादायक ट्रेक नाशिकच्या आजींनी केला पूर्ण, 170 मीटरच्या सरळ उंचीच्या 117 पायऱ्या केल्या सर

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 68 वर्षीय वयस्कर महिलेचा किल्ल्याच्या टॉपवर पोहोचण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे
  • हर्षगढ सर करण्याला हिमालयन माउंटेनियर जगातील सर्वात खतरनाक ट्रेक मानतात

जगातील सर्वात धोकादायक ट्रेकपैकी एक नाशिकपासून 60 कि.मी. अंतरावर असलेला हरिहर किल्ला 68 वर्षीय महिलेने सर केला आहे. हर्षगड नावानेही या किल्ल्याला ओळखले जाते. आजींचा किल्ल्याच्या शिखरावर पोहोचण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ट्विटर यूजर्स त्यांच्या उत्साहाचे कौतुक करत आहेत.

महिलेचे नाव आशा अंबाडे असे आहे. व्हिडिओमध्ये त्या पायऱ्यांच्या माध्यमातून किल्ला सर करताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत त्याच्या कुटुंबाचे काही सदस्य आणि त्यांचा नातू मृगांश देखील होता. हर्षगढ सर करण्याला हिमालयन माउंटेनियर जगातील सर्वात धोकादायक ट्रेक मानतात. येथे अनेक ठिकाणी 80 डिग्रीपेक्षा जास्त उभी चढाई आहे. हे आव्हान पूर्ण करत आशा अंबाडे या टॉपवर पोहोचताच त्यांच्यासोबत आलेल्या लोकांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून त्यांचे स्वागत केले. किल्ल्याच्या शिखरावर पोहोचल्यानंतर आशा यांनी तेथील भोले नाथ मंदिरात दर्शन केले आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' या घोषणा दिल्या.

ट्विटरवर होत आहे स्तुती
हा व्हिडीओ ट्विटरवर महाराष्ट्र माहिती केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पोस्ट केला होता. क्लिप शेअर करताना त्यांनी लिहिले की, 'जहां चाह वहा राह ...' माउली'ला मोठा सलाम.'

सर्वात पहिले डग स्कॉटने केला होता सर
हा किल्ला एक व्हर्टिकल पहाडावर आहे आणि यावर चढण्यासाठी अनेक लहान-लहान पायऱ्या आहेत. खालून हा चौकणी दिसतो पण याचा आकार प्रिज्मसारखा आहे. या किल्ल्याचा एक व्हर्टिकल ड्रॉप आहे. जेथून या खालील निरगुड़पाड़ा गाव दिसते. यावर सर्वात पहिले 1986 मध्ये डग स्कॉट (हिमालयन माउंटेनियर) ने चढाई केली होती यामुळे याला 'स्कॉटिश कडा'ही म्हणतात. हा किल्ला सर करण्यास त्यांना दोन दिवस लागले होते.

117 पायऱ्यांच्या आधारे सर करावे लागते 170 मीटर
जमिनीपासून 170 मीटवर असलेला हा किल्ला दोन्ही बाजूंनी 90 डिग्री सरळ आणि तिसऱ्या बाजून 75 च्या डिग्रीवर आहे. यावर चढण्यासाठी एक मीटर रुंग 117 पायऱ्या आहेत. ट्रॅक चिमनी स्टाइलमध्ये आहे, जवळपास 50 पायऱ्या चढल्यानंतर मुख्य द्वार, महा दरवाजा येतो. जो आजही खूप चांगल्या स्थितीत आहे.

किल्ल्याच्या टॉपवर हनुमान आणि भोलेनाथ मंदिर
येथून चढल्यानंतर पुढे पायऱ्या एका खडकाखालून जातात आणि तुम्ही किल्ल्याच्या शिखरावर पोहोचता. येथे हनुमान आणि महादेवाचे लहान मंदिर आहेत. तिथेच मंदिराजवळ एक छोटा तलाव आहे. येथील पाणी एवढे स्वच्छ आहे की, त्याचा आपण पिण्यासाठी वापर करु शकतो. येथून पुढे गेल्यावर दोन खोल्याचा एक महाल दिसतो, ज्यामध्ये 10-12 लोक थांबू शकतात.