आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण अपघात:मनमाड - येवला रोडवर भरधाव कार झाडावर आदळली, 4 तरुण जागीच ठार, 1 गंभीर

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनमाड - येवला रोडवरील अनकवाडे शिवारात कार झाडावर आढळून झालेल्या भीषण अपघातात 4 तरुण जागीच ठार झाले. एक गंभीर जखमी झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की यात कारचा अक्षरशः चुराडा झाला.

अपघातात 4 मित्रांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात 4 मित्रांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात तौफिक शेख, दिनेश भालेराव, प्रवीण सकट, गोकुळ हिरे हे जागीच ठार झाले. हे सर्वजण मनमाडचे रहिवासी होते. तर अजय वानखेडे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले आहे.

धडक एवढी भीषण होती की त्यात कारचा अक्षरश: चुराडा झाला.
धडक एवढी भीषण होती की त्यात कारचा अक्षरश: चुराडा झाला.
बातम्या आणखी आहेत...