आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरणाचा जागर:महाराष्ट्र चेंबर लावणार 3 महिन्यात 10 लाख झाडे; अध्यक्ष ललित गांधी यांची मोठी घोषणा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तीन महिन्यात दहा लाख वृक्षारोपण करण्याबरोबरच या क्षेत्रातील विविध उपक्रम राबविण्यात येतील, अशी माेठी घाेषणा राज्यातील उद्याेजक व व्यापाऱ्यांची संघटना महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केली. उद्याेग आणि व्यापार क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिखर संस्थेने पर्यावरण संवर्धनासाठी घेतलेली ही दखल महत्वाची मानली जात असून उद्याेग-व्यापारी येते तीन महिने वृक्षलागवडीसाठी सरसावल्याचे चित्र यामुळे पुढील तीन महिने पहायला मिळणार आहे.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरतर्फे येणाऱ्या पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मसिआ इनकॉन टॉक्स चे आयाेजन करण्यात आले हाेते, यात गांधी मार्गदर्शन करीत हाेतेे व्यासपीठावर आमदार देवयानी फरांदे, चेेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, धनश्री हरदास, अमिल टिल्लु, शहर अभियंता शिवकुमार वंजारी आदी उपस्थित होते.

भगवान महावीरांनी 2600 वर्षापूर्वीच जीवनशैली कशी असावी याबाबतचे मार्गदर्शन केले आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज पर्यावरण संवर्धन करण्याची गरज संपूर्ण जगात निर्माण झाली आहे. आज आपण निसर्गाचे रक्षण केले तर उद्या निसर्ग आपले रक्षण करेल असे गांधी यावेळी म्हणाले. जैविक विविधता तज्ञ अमित टिल्लू यांनी जैविक विविधता फूड चेन, नाशिकचे पर्यावरण व काल आज आणि उद्या याबाबत उदाहरणासह माहिती दिली. पर्यावरण संवर्धन करण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमदार देवयानी फरांदे यांनी पर्यावरणाविषयी चौफेर चर्चा करताना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी तांत्रिकदृष्ट्या सबल होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले तसेच फूड चैन व बायो मॅगनिफिकेशन यांचा संदर्भ घेत आज नागरिकांनी काय केले पाहिजे यासंदर्भात प्रभावीपणे मत मांडले, देवांग जानी यांनी गोदावरी नदी येथील अंतर्भूत असलेले जलस्रोत जीवंत करण्याचे कार्य करत असून या प्रक्रियेची माहिती दिली. तसेच गोदावरी नदीपात्रातील आणखी जलस्रोत जीवंत करण्यासाठी मांडणी केली. पर्यावरण तज्ञ शेखर गायकवाड यांनी शहराच्या व गावाच्या वस्ती भागात झाडे कुठली व कशी लावावी त्यांचे संगोपन कसे करावे. डोंगराळ भागात झाडे कशी लावावीत याची माहिती उदाहरणासह दिली. स्वागत व सूत्रसंचालन उत्तर महाराष्ट्र चेअरमन कांतीलाल चोपडा यांनी केले तर आभार प्रदर्शन को-चेअरमन संजय सोनवणे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...