आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:द मदर टेरेसा स्कूलमध्ये महाराष्ट्रदिनी विद्यार्थ्यांचा सन्मान; कामगार दिनाचे निमित्त साधून विजय पवार आणि छाया बिडलान यांना स्मृतिचिन्ह देत गौरविण्यात आले

नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

द मदर टेरेसा इंग्लिश स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शैक्षणिक, क्रीडा तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कामगार दिनाचे निमित्त साधून विजय पवार आणि छाया बिडलान यांना स्मृतिचिन्ह देत गौरविण्यात आले.

बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप सोडलेल्या खेळाडूंसह शाळेच्या ट्रस्टी देवकाबाई गबाजी बाविस्कर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शाळेतील उत्कृष्ट विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले. यासोबतच इंटरनॅशनल मॅथस् आणि इंग्लिश, सायन्स ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल व प्रमाणपत्र मिळवत पुढच्या स्तरावर पात्र झालेल्या तब्बल १४ विद्यार्थ्यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. दरम्यान, यावेळी माजी नगरसेविका प्रतिभा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले.

कार्यक्रमाप्रसंगी प्रसंगी मुख्याध्यापिका संगीता बाविस्कर, संचालक गोपीनाथ रोडे, देवरे आदींनीही विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...