आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यातील कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी सोशल मीडियावरून यासंदर्भातील अधिकृत माहिती जारी केली. माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून माझी प्रकृती सध्या ठीक आहे. गेल्या 2 ते 3 दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची टेस्ट करून घ्यावी असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे.
माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी.माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.मास्क,सॅनिटायझर चा नियमित वापर करा.#COVID19
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) February 22, 2021
छगन भुजबळ यांनी रविवारीच नाशिकमध्ये पार पडलेल्या एका लग्नात हजेरी लावली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हजेरी लावली होती. लग्नात बहुतांश लोकांनी मास्क घातला होता. परंतु, एकमेकांच्या संपर्कात आल्याने पवारांनाही आता कोरोनाचा धोका आहे. शरद पवार आपली कोरोनाची टेस्ट करून घेणार असे सांगितले जात आहे.
या नेत्यांनाही झाली होती कोरोनाची लागण
उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, कापड उद्योग मंत्री असलम शेख, उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंत्री उदय सामंत, जीतेंद्र आव्हाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री संजय बंसोड, महसूल मंत्री अब्दुल सत्तार इत्यादी नेत्यांना कोरोनाची लागण झाली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.