आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर भारतात एका पाठोपाठ चक्रावात सुरू आहे, दोन्ही चक्रावातामध्ये पुरेसा काळावधी मिळाला नसल्याने थंडीचा अपेक्षित परिणाम जाणवत नाही. पहिल्या चक्रावाताची थंडी पडत नाही तोच दुसऱ्या चक्रावातामुळे हवेच्या कमी दाब क्षेत्राचे त्या थंडीवर आक्रमण झाल्याने थंडी विस्कळीत होवून किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे गुजराथसह महाराष्ट्रातील थंडीचे प्रमाण कमी झाले असून विदर्भात फक्त किमान तापमानात घसरण असल्याने थंडी जाणवत आहे.
राज्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात किमान तापमानात सरासरीपेक्षा 2 ते 4 अंश सेल्सीअसने वाढ झाली असुन थंडीचा जोर कमी झाला आहे.तसेच सध्या ढगाळ वातावरण नसले तरी, जास्त उंचीपर्यंत ढगाळसदृश्य धुक्याचा मळभ आच्छादित असल्याने रात्रीतून जमिनीतूनही उत्सर्जित होणारी दिर्घलहरी उष्णता व ऊर्जा पूर्णपणे उत्सर्जित होत नाही.त्यामुळे किमान तापमानात अपेक्षित घसरण होत नाही. तसेच दिवसाही अशा वातावरणामुळे लघुलहरी उष्णता व ऊर्जा जमीन तापवत नाही त्यामुळे हवेचा थरही शुष्क होत नसल्याने थंडी जाणवत नसल्याचे हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. मात्र उत्तरे भारताकडून मंद झुळूक असलेल्या वाऱ्याच्या वेगात अधिक वाढ झाली असुन उत्तर भारतातील थंडी ही महाराष्ट्रात येत असल्याने सकाळसह दिवसभर बोचऱ्या वाऱ्यातुन गारवा कमी अधिक प्रमाणात जाणवत असल्याचेही खुळे यांनी सांगितले. शनिवारी नाशिक जिल्ह्यात सकाळी दाट धुके जाणवत असल्याने दृश्यता काही प्रमाणात कमी झाली होती.तर या धुक्याचा बाळगोपाळ आनंद घेत होते.
असे होते राज्यातील किमान तापमान
गोंदिया 7.0, नागपुर 9.9, वर्धा 11.8, गडचिरोली 12.0, औरंगाबाद 12.4, उस्मानाबाद 12.5,यवतमाळ 13.0 अमरावती 13.1, जळगाव 14.0, महाबळेश्वर 14.0, चंद्रपुर 14.0, जालना 15.0, परभणी 15.4,नाशिक 15.4, पुणे 16.3,
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.