आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त वक्तव्य:नारायण राणेंवर संतापलेल्या शिवसैनिकांनी भाजपचे कार्यालयच फोडले, नाशिकमधील 'वसंत स्मृती' कार्यालयावर दगडफेक

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जुन्या नाशिकमध्ये भाजपचे वसंत स्मृती या कार्यालयावर हल्ला करण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे अडचणीत सापडले आहेत. राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांमध्ये संताप दिसत आहे. दरम्यान संतापलेल्या शिवसैनिकांनी नाशिकमध्ये भाजपचे कार्यालयाच फोडले आहे. शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयावर दगडफेक केली.

जुन्या नाशिकमध्ये भाजपचे वसंत स्मृती या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. शिवसैनिक गाडीत बसून आले यानंतर शिवसैनिकांवर या कार्यालयावर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. दरम्यान शिवसैनिक जोरदार घोषणाबाजी करत होते. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला कोरोनाच्या काळात उत्तम प्रकारे सावरले आहे. ते आमचे कुटुंब प्रमुख आहे. उद्धव ठाकरेंवर टीका केली तर त्याचे जशास तसे उत्तर दिले जाईल असे शिवसैनिकांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण ?
भाजप नेत्यांची सध्या जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. या निमित्त नारायण राणे हे सध्या कोकणामध्ये आहेत. दरम्यान त्यांनी पत्रकारांसोबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थितांना संबोधित असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचे न बोलता चुकून हिरक महोत्सव हा शब्द वापरला. दरम्यान तिथे उपस्थित राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेंनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचे सांगितले यानंतर मुख्यमंत्र्यांनी चूक सुधारत 'आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हिरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत' असे म्हटले होते. यावरुन राणे म्हणाले होते की, मी जर तिथे असतो तर कानाखाली लगावली असती. यावरुन नारायण राणेंवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

बातम्या आणखी आहेत...