आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Maharashtra State First Biosafety Laboratory In Nashik | Marathi News | Nashik's First Biosafety Laboratory In The State; 25 Crore Mobile Van Unveiled At A Special Event Tomorrow

दिव्य मराठी विशेष:राज्यातील पहिली जैव सुरक्षा प्रयोगशाळा नाशिकला; 25 कोटींच्या मोबाइल व्हॅनचे उद्या विशेष कार्यक्रमात लोकार्पण

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजूनही जे भाग रेल्वे-रस्ते सेवेने पद्धतीने जोडले गेलेले नाहीत त्या भागासाठी जैव सुरक्षा प्रयाेगशाळा (माेबाइल व्हॅन) तयार करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रात प्रथमच आणि देशातील दुसरीच अशी ही व्हॅन नाशकात उपलब्ध झाली असून त्याचा फायदा दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांना हाेणार आहे.

काेविडसारख्या इतरही सूक्ष्म किंवा अतिसूक्ष्म जिवाणूंपासून होणारे संभाव्य प्राणघातक आजार टाळण्यासाठी प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशनच्या वतीने BSL-3 कंटेनमेंट प्रयोगशाळा बनविण्यात आली आहे. जवळपास २५ कोटींच्या या मोबाईल व्हॅनचे केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री भारती पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १८) सकाळी ११ वाजता महाकवी कालिदास कला मंदीरातील कार्यक्रमादरम्यान लाेकार्पण हाेणार आहे.

यावेळी डीएचआर आणि आयसीएमआरचे महासंचालक प्रा.डॉ. बलराम भार्गव, डीएचअर, सहसचिव अनु नगर आयसीएमआर-एनआयव्हीचे शास्त्रज्ञ तसेच नाशिक येथील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अशी आहे माेबाइल व्हॅन

जैव-सुरक्षा सज्जता आणि महामारी संशोधनाला बळकटी देण्यासाठी देशात चार मोबाईल जैव सुरक्षा स्तर -३ (BSL-3) प्रयोगशाळा प्रदान करण्यात येणार आहेत. या प्रयोगशाळांमध्ये निदान आणि संशोधनाशी सुसंगत सुविधा व उपकणे आहेत. ज्यात देशी आणि विदेशी सूक्ष्मजीव यावर संशोधन करण्यात येणार आहे. यातील कर्मचाऱ्यांना व्यापक प्रशिक्षण दिले जाणार असून ही प्रयोगशाळा मोठ्या आरोग्य सेवा आणि संशोधन संस्थांशी संलग्न असेल.

ही प्रयोगशाळा प्रगत व्हेंटिलेशन व कम्युनिकेशन सिस्टीमसह सुरक्षेसह सुसज्ज आहे. BSL-3 प्रादुर्भाव, क्षेत्रतापासणी, संसर्गजन्य विषाणूंचा सर्वेक्षणाचा समावेश असलेल्या क्षेत्रीय कार्यासाठी आवश्यक आहे. हे उपकरण वेळेवर आणि जलदगतीने ऑनसाईट निदान आणि अहवाल देण्यासाठी उपयुक्त ठरेल. ही व्हॅन उच्च जोखमीच्या संसर्गजन्य रोगाच्या उपचारादरम्यान देशाच्या प्रयोगशाळेची प्रतिसाद क्षमता वाढविण्यासाठी योगदान देईल.

बातम्या आणखी आहेत...