आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा:महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग; एमपीएससीतर्फे 800 पदांसाठी ऑक्टाेबरमध्ये परीक्षा

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे राज्य शासनाच्या विभागांतर्गत विविध संवर्गातील एकूण ८०० पदांची भरती होणार असून त्यासाठी आयोगातर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट - ब संयुक्त पूर्वपरीक्षा २०२२ ही येत्या ८ ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे. राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून २५ जून ते १५ जुलै या कालावधित स्पर्धा परीक्षांची तयारी करू इच्छिणाऱ्या तसेच इतर विद्यार्थ्यांनाही अर्ज करण्याची संधी असेल.

एमपीएससीतर्फे ८०० पदांच्या भरती प्रक्रियेत सामान्य प्रशासन विभागातील सहायक कक्ष अधिकारी, गट - ब या संवर्गातील ४२ पदांची भरती होईल. तर वित्त विभागातंर्गत राज्य कल निरीक्षक ७७ पदे, गृह विभागातील पोलिस उपनिरीक्षक ६०३ पदे, महसूल व वनविभागांतर्गत दुय्यम निबंधक, मुद्रांक निरीक्षक, ७८ पदे असे एकूण ८०० पदांची भरती होणार आहे. विशेष म्हणजे, दुय्यम निबंधक व मुद्रांक निरीक्षक हे पद पहिल्यादा एमपीएससीद्वारे भरले जात आहे.

पूर्वपरीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता मुख्य परीक्षा डिसेंबर २०२२ नंतर होईल.पूर्वपरीक्षा १०० गुणांसाठी तर मुख्य परीक्षा ४००गुणांसाठी होईल. उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणी १०० गुण व मुलाखत ४० गुण या प्रमाणे होईल. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची १५ जुलै ही अंतिम मुदत आहे.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी संधी
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली संधी असेल. ८०० पदांच्या भरती प्रक्रियेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आतापासूनच तयारी केल्यास निश्चित यश मिळू शकेल. नियमित अभ्यास, योग्य मार्गदर्शन मिळाल्यास स्पर्धा परीक्षांमध्ये नक्कीच यश मिळू शकेल. विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा.
- प्रा. राम खैरनार, संचालक, युनिव्हर्सल फाउंडेशन