आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासण, समारंभ , उत्सवांसाचे गेल्या काही वर्षांचे बदलत जाणारे स्वरूप व विस्कळीत झालेले निसर्गचक्र पहाता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने 'होळी करा लहान, पोळी करा दान' या उपक्रमांतर्गत नाशिक शहरातून पुरणपोळी तसेच खाद्यपदार्थ होळीत न टाकता त्यांचे दान करावे असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
समाजातील एकोपा वाढावा, तणावमुक्ती व्हावी यासाठी पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी महाराष्ट्र अनिस प्रयत्नशील आहे. या वर्षीही महाराष्ट्र अंनिसच्या नाशिक जिल्हा शाखेच्यावतीने . होळीच्या ठिकाणी संकलित झालेल्या पुरणपोळ्यांचे गरजू आणि गरीब कुटुंबांना, अनाथाश्रम, वृद्धाश्रमामधील गरजूंना या आनंदाच्या सणात सहभागी करून घेतले जाणार आहे.
अन्नाची नासाडी
माणसातील दुर्गुणांची होळी करावी, असा नितीयुक्त संदेश देणारा होळीचा सण. मात्र आजही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाकूड, गोवऱ्या जाळून चढाओढीने साजरा केला जातो. प्रत्यक्ष होळी पेटली असताना होळीत नारळ, खोबरे व पुरणपोळी असे खाद्यपदार्थ टाकून जाळले जातात. त्यामुळे अन्नाची नासाडी होते असे महाराष्ट्र अनिसचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. समीर शिंदे यांनी सांगितले.
इजा होण्याचा धोका
पुढे ते म्हणाले की, होळी जवळच अर्वाच्य शब्दात बोंबा मारल्या जातात. होळी नंतर येणारा रंगपंचमी हा सणही प्रचंड पाण्याची नासाडी करणारा असतो. रासायनिक रंगाने रंगपंचमी खेळली जाते. त्यामुळे पाण्याचा अनाठाई अपव्यय तर होतोच शिवाय रासायनिक रंगामुळे त्वचेला आणि डोळ्याला गंभीर इजा होण्याचा मोठा धोकाही असतो. पाणी आणि रासायनिक रंगांऐवजी फक्त वनस्पती रंग वापरून पाण्याशिवाय रंगपंचमी खेळावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हा प्रधान सचिव नितीन बागुल, महेंद्र दातरंगे आदी उपस्थित होते.
प्रतिकात्मक होळी साजरी करावी
महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे म्हणाले की, एका गावात, काॅलनीत, गल्लीत एकच लहान, प्रतिकात्मक होळी करावी. होळीसाठी लाकूड, गोवऱ्या जाळू नयेत. पुरणपोळी, नारळ, खोबरे असे खाद्यपदार्थ होळीत टाकण्याऐवजी त्यांचे गरजू व गरीब कुटुंबांमध्येमध्ये वाटप करावे. कुणाबाबतही अर्वाच्य शब्द उच्चारू नयेत. या उपक्रमातून गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचवा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.