आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किमान तापमानात वाढ, पण शीतलहरीमुळे दिवसभर गारवा:नाशिक, चंद्रपूर, नागपुरात ढगाळ वातावरण, धुळ्यात 7.6 निचांक

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर भारतातील विविध राज्यामध्ये थंडीची तीव्रता वाढली असुन तसेच वाऱ्याचा वेगही वाढला आहे. उत्तरेकडुन येणाऱ्या गार वाऱ्याचा वेग हा प्रति ताशी 12 ते 14 किलोमीटर असल्याने तसेच राज्यात बुधवारी सकाळपासुन ढगाळ वातावरण असल्यामुळे दिवसभर वातावरणात गारवा जाणवत होता. तर ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सीअसने वाढ झाली होती. उत्तर महाराष्ट्रातील धुळे येथे बुधवारी निचांकी 7.6 अंश सेल्सीअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली होती.

राज्यात ढगाळ वातावरण

बुधवारी राज्यातील नाशिक, चंद्रपुर, नागपुर या जिल्ह्यात सकाळपासुन ढगाळ वातावरण तयार झाले होते, त्यामुळे किमान तापमानात वाढ झाली होती. परंतू गार वारे वाहत असल्याने बोचऱ्या थंडीचा नागरिकांना अनुभव मिळत होता.तसेच दुपारनंतर चंद्रपुर आणि नागपुर येथे ढगाळ वातावरणामुळे हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर दुपारी काही काळ आकाश स्वच्छ झाल्यानंतर उन्हाची तीव्रता वाढली होती, परंतू वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे नागरिकांनी दिवसभर सुर्यस्नान घेणे पसंत केले.

असा रहाणार अंदाज

उत्तर भारतात थंडीची लाट ही तीव्र होत असुन आगामी तीन ते चार दिवसात महाराष्ट्रात थंडी वाढण्याची शक्यता आहे. सध्या राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली या राज्यांमध्ये थंडीची लाट वाढली आहे.तसेच भारताच्या इशान्य भागातील राज्यामध्ये दाट धुके रहाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

असे होते राज्यातील किमान तापमान

धुळे 7.6,जळगाव 10.5, निफाड 10.6, औरंगाबाद 11.5, जालना 13.0, नाशिक 13.2, पुणे 13.8, महाबळेश्वर 14.4, डहाणु 15.0, बारामती 15.6

बातम्या आणखी आहेत...