आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

45 प्लस लसीकरण आजपासून:केंद्राकडून महाराष्ट्राला आज मिळणार कोविशील्डचे 26 लाख 77 हजार डोस

नाशिक12 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • राज्यात 45 वर्षांवरील लोकांची संख्या 3 कोटी 68 लाख आहे.

देशात ४५ वर्षांवरील नागरिकांचे गुरुवारपासून लसीकरण सुरू होणार असून केंद्र सरकारकडून राज्याला कोविशील्ड लसीचे गुरुवारी २६ लाख ७७ हजार डोस मिळणार अाहेत. तरीही ३ कोटी लाभार्थींसाठी लसीची टंचाई भासणार आहे.

राज्यात ४५ वर्षांवरील लोकांची संख्या ३ कोटी ६८ लाख आहे. यापैकी ५२ लाख ९६ हजार ४१३ लाभार्थींनी पहिला डोस घेतला आहे, तर ७ लाख ३३ हजार २३६ लाभार्थींचा दुसरा डोस झाला आहे. रोज सरासरी २ लाख लाभार्थींचे लसीकरण होत असून आतापर्यंत ६० लाख २९ हजार जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेले नागरिकांचा समावेश आहे. ४५ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू होत असून या वयोगटाची संख्या ३ कोटी ६८ लाख आहे. यापैकी ६० लाखांचे लसीकरण झाले असले तरी ३ कोटींचे बाकी आहे. त्यासाठी केंद्राकडून २६ लाख ७७ हजार डोस मिळणार आहेत. रोज २ लाख डोस ही आतापर्यंतची सरासरी धरली तरी ही लस पुढील १० ते १३ दिवस पुरेल, असा सूत्रांचा अंदाज आहे.

अशी आहे गरज

 • ४५ वर्षांवरील लोकांची संख्या ३ कोटी ६२ लाख
 • आतापर्यंत ६० लाख २९ हजार लाभार्थींचे लसीकरण पूर्ण
 • ३ कोटी लाभार्थींचे लसीकरण बाकी
 • दररोज सरासरी २ लाख लसीकरण

अशी आहे स्थिती

 • आरोग्य कर्मचारी - ९, ९१, ८१२ (पहिला डोस)
 • आरोग्य कर्मचारी - ४, ७४, ७२३ (दुसरा डोस)
 • फ्रंटलाइन वर्कर्स - ८, ५०, ९५३ (पहिला डोस)
 • फ्रंटलाइन वर्कर्स - २, ५६, ७०० (दुसरा डोस)
 • ४५+ जोखमीचे नागरिक - ६, ७१, १४४ (पहिला डोस)
 • ४५ + जोखमीचे नागरिक - ३३१ (दुसरा डोस)
 • ६० + वयोगटातील नागरिक २७,८२,५०४ (पहिला डोस)
 • ६० + वयोगटातील नागरिक - १, ४८२ (दुसरा डोस)

(स्रोत - सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य)

बातम्या आणखी आहेत...