आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य तलवारबाजी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व फेन्सिंग फेडेरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली स्व. मिनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे कॅडेट गटाच्या १८ वर्षे वयोगटाच्या १७ व्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेला रविवारी (दि ११) प्रारंभ झाला. स्पर्धेत महाराष्ट्र संघाने विजयी सलामी दिली.
उद्घाटन अखिल भारतीय मराठा महासंघाचे सचिव प्रमोद जाधव, कालिका देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत संपूर्ण ३२ राज्यांचे १४७८ खेळाडू सहभागी झाले. यामध्ये यजमान महाराष्ट्रासह दिल्ली, पश्चिम बंगाल, एस. एस. सि. बी., केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, छत्तीसगड, पोंडेचरी, गुजराथ, दिव-दमण, राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, ओरिसा, मिझोराम, मणीपुर, चंदीगड, अरुणाचल प्रदेश, नागालँड, चंदीगड, गोवा, मिझोराम, त्रिपुरा, पोंडेचरी याचा समावेश आहे.या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची जागतिक स्पर्धा, आशियाई स्पर्धा यासाठी निवड केली जाणार आहे.
तर या स्पर्धेतील पहिले आठ संघ मध्यप्रदेश येथे आयोजित खेलो इंडिया स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. एस.एस.सी. बी. आणि महाराष्ट्राच्या खेळाडूनी सुंदर खेळाचे प्रदर्शन करून पहिल्या फेरीमध्ये विजय प्राप्त केले. तर हरियाणा, मणीपुर, जमू-काश्मीरच्या खेळाडूनीही चांगला खेळ करून पहिला राऊंड जिंकून चांगली सुरवात केली. मुलींच्या फॉईल प्रकारात वैदेही, अंकिता सोळकी, गायत्री गोरे आणि यशश्री वंजारे यांनी फेरीमध्ये चांगला खेळ केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.