आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Maharashtra's Ishwari Sonawane Wins Gold In The Girls' 44 Kg Category At The National Ranking Taekwondo Championships In Nashik; Prince Won Gold In The Boys' 57kg Group

नाशिकमध्ये राष्ट्रीय रँकिंग तायक्वांदो स्पर्धा:महाराष्ट्राच्या ईश्वरी सोनवणेला 44 किलो गटात सुवर्ण; मुलांच्या 57 किलो गटांमध्ये प्रिन्सला सुवर्ण पदक

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे खुल्या राष्ट्रीय रँकिंग तायक्वांदो स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धाना रविवारी दि.12 प्रारंभ झाला. स्पर्धेच उदघाटन आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते करण्यात आले

नाशिकमध्ये होत असलेल्या या स्पर्धेत आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, चंदिगड आदी एकूण वीस राज्याच्या संघातील खेळाडूंनी सहभाग घेतला आहे स्पर्धा कॅडेट व ज्युनिअर गटात होत आहे. याप्रसंगी भारतीय ताइक्वांडो फेडरेशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर, आंतरराष्ट्रीय पंच तिरूमल जे.( कर्नाटक) अनुप दीक्षित. ( दिल्ली )विनोद कुमार,( हिमाचल प्रदेश) आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धा दोन दिवस सुरु रंगणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवसी मुलींच्या कॅडेट गटात 51 किलो गटामध्ये आंध्र प्रदेशच्या रेणुका कांती हिने सुवर्णपदक मिळवले कर्नाटकच्या श्रावणी श्री हिने रौप्यपदक तर आंध्र प्रदेशच्या रिश्ता रेड्डी हिने कांस्यपदक मिळवले. मुलींच्या 44 किलो गटात महाराष्ट्राच्या ईश्वरी सोनवणेने सुवर्ण व आर्य धुमाळ हिने रौप्यपदक मिळवले कास्यपदक चंदीगड च्या ममता ने पटकावले. मुलांच्या 57 किलो गटांमध्ये महाराष्ट्राच्या प्रिन्सने सुवर्ण हरियाणाच्या हार्दिक अहलावतने रौप्य, आंध्रप्रदेशच्या मुकेश कुमारने कास्य पदक पटकावले. 49 किलो या गटामध्ये चंदीगडच्या निखिलने सुवर्ण उत्तर प्रदेशच्या राजकुमारने रौप्प पदक,मध्यप्रदेशच्या सज्जन कुमारने कांस्य पदक पटकावले.

बातम्या आणखी आहेत...