आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्राच्या उत्तर सीमेलगतच्या ५५ पेक्षा अधिक गावांतून सध्या गुजरातेत समावेशाची मागणी जोर धरत आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागातील स्थितीचे वास्तव पुढे आणणारा हा स्पॉट रिपोर्ट...
आम्हालाही महाराष्ट्राचा अभिमान आणि मराठी स्वाभिमान आहे... निष्ठा आणि नाळसुद्धा याच मातीशी आहे... मात्र, दैनंदिन गरजा, व्यवहार आणि सहज नजरेत भरणारा ‘तिकडचा’ विकास यामुळे भावनांना बांध घालत आणि मनावर दगड ठेवत आम्हाला गुजरातमध्ये समावेशाची मागणी करणे भाग पडत आहे...’ अशी व्यथा रगतविहीरच्या यशवंत चौधरी या बेरोजगार युवकाने व्यक्त केली. बीएड करून नोकरी नाही आणि शेती असून पाणी नाही. त्यामुळे हाताला काम नसल्याचे सांगत यशवंतने आपला रोष व्यक्त केला. सीमावर्ती भागातील बहुसंख्य गावकऱ्यांनीसुद्धा ‘दिव्य मराठी’शी बोलताना अशाच भावना व्यक्त केल्या. संबंधित गावांतून पुढे येत असलेल्या गुजरातमध्ये समावेशाच्या मागणीमागची मुख्य प्रेरणा आहे ती एकमेकांपासून शब्दश: हाकेच्या अंतरावर असलेल्या दोन्ही ठिकाणच्या गावांमधील विकास आणि सोयी-सुविधा यांची मनोमन होणारी तुलना. ‘दिव्य मराठी’ने काठीपाडा, निंबारपाडा, गावितपाडा, शिवपाडा, रगतविहीर, बर्डीपाडा या महाराष्ट्रातील तसेच त्यालगत असलेल्या मोरदहाड, निरपण, चोरवणी या गुजरातमधील गावांचा दौरा केला असता विकासातील फरक तीव्रतेने जाणवला.
रस्ते : पाहताक्षणी फरक स्पष्ट दोन्ही ठिकाणच्या रस्त्यांमध्ये एवढा फरक आहे की पाहताक्षणीच महाराष्ट्र आणि गुजरातची हद्द कुठे सुरू होते ते लक्षात येते. महाराष्ट्राच्या हद्दीत तुटके, फुटके, खड्डेमय, कच्च्या स्वरूपाचे रस्ते आहेत. तर गुजरातची हद्द सुरू होताच रस्ते आपले रूप पालटतात. पक्के, प्रशस्त आणि गुळगुळीत रस्ते लागले की तिथे गुजरातची हद्द सुरू होणार हे निश्चित.
शिक्षण : गुजरातच्या शाळांसह वसतिगृहेही चकाचक शैक्षणिक सुविधांच्या बाबतीतही गुुजरात आघाडीवर आहे. दाेन्ही राज्यांच्या सीमेवरील रगतविहीर गावातील प्राथमिक शाळेची इमारत जेमतेमच आहे. त्याउलट अगदी शेजारी असलेल्या गुजरातमधील निरपण, चाेरवणी या गावांमधील शाळा इमारती सुसज्ज आहेत. शाळेजवळच असणारी वसतिगृहे चकाचक आणि साेलारसारख्या साेयी-सुविधांनी परिपूर्ण आहेत.
सीमावर्ती भागातील गावांमधला फरक {पाणीपुरवठा : महाराष्ट्रात पाण्यासाठी एक ते दीड किलाेमीटर पायपीट, गुजरातेत घराघरांत नळ. {सिंचन : महाराष्ट्रातील शेती केवळ पावसाच्या भरवशावर, तर गुजरातेत शिवारापर्यंत पाइपलाइन. { आराेग्य : आैषधाेपचार ते शस्त्रक्रिया सर्व सुविधांसाठी महाराष्ट्रातील गावे गुजरातच्या वांसदा व धरमपूरवर अवलंबून. {निधी वाटप : महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातेत विकासकामांना जवळपास चाैपट निधी.
सविस्तर वृत्तांत खालील लिंक वर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.