आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराव्हेंटिलेटर्सच्या कमतरतेमुळे कोरोनाच्या गंभीर रुग्णांचे प्राण तडफडत असताना महाराष्ट्र शासनाने वर्षभरापूर्वी सुरू केलेली १५० व्हेंटिलेटर्सची खरेदी निधीअभावी रखडल्याची धक्कादायक माहिती “दिव्य मराठी’च्या हाती लागली आहे. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या खरेदी कक्षाच्या वतीने गेल्या वर्षी मार्चमध्ये राज्यातील २७ शासकीय रुग्णालयांसाठीच्या व्हेंटिलेटर्ससाठी ही खरेदी सुरू करण्यात आली होती. त्यापैकी ४७ व्हेंटिलेटर्स मिळाले. मात्र पैसे फक्त ३७ व्हेंटिलेटर्सचे देण्यात आल्याने ११३ व्हेंटिलेटर्सचा पुरवठा वर्षभरापासून खोळंबला.
शासकीय रुग्णालयांत व्हेंटिलेटर्सची कमतरता पाहता गेेल्या वर्षी मार्चमध्ये आरोग्य सेवा संचालकांच्या मागणीनुसार हाफकिन महामंडळाच्या वतीने १५० व्हेंटिलेटर्सच्या खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. २१ मार्च २०२० च्या बैठकीत निविदेस मंजुरी देण्यात आली. “कोविड स्थिती पाहता १५ दिवसांत पुरवठा करावा’ अशी पहिलीच अट होती. यावरून खरेदीची निकड सिद्ध होऊनही प्रत्यक्षात वर्ष उलटून गेले तरी फक्त ४२ व्हेंटिलेटर्सचा पुरवठा झाला. धक्कादायक बाब म्हणजे, १५० व्हेंटिलेटर्ससाठी बायोट्रोनिक्स इक्विपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे १७.२२ कोटींची मागणी नोंदवण्यात आली होती. त्यानुसार वितरकाने ४२ व्हेंटिलेटर्स पुरवले देखील. मात्र प्रत्यक्षात त्यांना फक्त ३७ व्हेंटिलेटर्सचे ४ कोटी २१ लाख ८१ हजार रुपये देण्यात आल्याने कंपनीने उरलेल्या १०८ व्हेंटिलेटर्सचा पुरवठा अद्याप केलेला नाही.
यांच्यासाठी नोंदवली होती व्हेंटिलेटर्सची खरेदी
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर (३४ नग), ससून रुग्णालय (११), मीरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (१०), वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ (८), लातूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (८), नांदेडचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (६), स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अंबेजोगाई (६), गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (६), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद (५), जे जे रुग्णालय, मुंबई (५), राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर, धुळे ( प्रत्येकी ३), पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सांगली, ससून हॉस्पटील पुणे, मिरज, अकोला, नांदेड, मुंबई, जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी ( प्रत्येकी २)
खरेदीतही मुदतीनंतर बदल
गेल्या मार्च महिन्यातील या १५० व्हेंटिलेटर्सची खरेदी रखडली असताना इतर तीन वेळा हाफकिन महामंडळाच्या वतीने करण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्स खरेदीबाबत आरोग्य विभागाने अनेक घोळ घातल्याचे पुढे येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.